Friday, May 3, 2024
Homeजळगावफेसबूकवर धार्मिक भावना दूखावणारी पोस्ट

फेसबूकवर धार्मिक भावना दूखावणारी पोस्ट

अमळनेर प्रतिनिधी Amalner

अ भा वि प च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी धूळे येथे केलेल्या लाठी चार्जवर फेसबुक या सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी बाजार समिती संचालक…

- Advertisement -

पराग शाम पाटील यांच्या विरुद्ध ॲड. शकिलोद्दीन आमिरोद्दीन काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे दौ-यावर आले असताना अ.भा.वि.प. च्या कार्यकत्यांनी त्यांना विद्यार्थ्यांच्या काही मागण्या करीता घेराव घातला होता. त्यावेळी पोलीसांना त्याच्यावर लाठी चार्ज करावा लागला होता. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रासह, जळगाव जिल्हयात तसेच अमळनेर शहरात देखील उमटले. त्या घटनेच्या अनुषगांने दि.२८ ऑगस्ट रोजी पराग शाम पाटील यांनी या घटनेच्या निषेर्धात त्यांचे फेसबुक अकाउंटवर मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील,अशी एक पोस्ट शेअर केली आहे, असे अँड.शकील काझी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या