Monday, May 20, 2024
Homeजळगावसीएमव्हीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

सीएमव्हीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

जळगाव – jalgaon

कुकुंबर मोझियाक व्हायरस (Cucumber mosaic virus) अर्थात सीएमव्ही रोगामुळे (CMV disease) जिल्ह्यातील केळी उत्पादकांना धडकी भरली असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या पुढाकाराने या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून लवकरच या शेतकर्‍यांना भरपाई मिळणार आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ५८ कोटी रूपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव सादर केला असून यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जळगाव जिल्हा दौऱ्यात सीएमव्हीग्रस्त शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक असणार्‍या केळीवर सध्या कुकुंबर मोझियाक व्हायरस अर्थात सीएमव्ही या रोगाचा प्रादूर्भाव झालेला आहे. हा रोग झाल्यानंतर संपूर्ण शेतातील पिकच काढून फेकावे लागते. सदर रोग संसर्गजन्स असून यामुळे केळी उत्पादक धास्तावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर असतांना २० सप्टेंबर रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कानावर केळी उत्पादकांची व्यथा घातली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सीएमव्हीग्रस्त शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली होती. या अनुषंगाने २१ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सीएमव्हीग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच, नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ११ रूपये प्रति रोप या सवलतीच्या दरात टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध करण्यात येतील असा निर्णय देखील घेण्यात आला होता.

दरम्यान, यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील २७५ गावांमधील १५६६३ शेतकर्‍यांना सीएमव्ही रोगाचा फटका पडल्याचे दिसून आले. यामुळे एकूण ८७७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. यात एकूण ११ रूपये प्रति रोप या मूल्यानुसार ३,८९,७७६५७ रोपांचे एकूण ४२ कोटी ८९ लक्ष ५४ हजार २३१ रूपये इतके अनुदान देय आहे. तर, १५ रूपयांच्या सरासरी दरानुसार याचे मूल्य ५८ कोटी ४६ लक्ष ६४ हजार ८५५ रूपये इतके अनुदान देय आहे. या संदर्भातील प्रस्ताव ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार शासनाकडे पाठविण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या