Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजइमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

इंदिरा नगर | प्रतिनिधी Indira Nagar

- Advertisement -

प्रभाग क्रमांक 31 मधील पाथर्डी फाटा, नरहरी नगर येथे रविवारी सायंकाळी 7 वर्षाचा मुलगा इमारतीच्या गॅलरीतून चौथ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

शिवगंगा एव्हन्यू इमारतीत राहणारा कियांश प्रफुल्ल बेदाडे (वय 7) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सुट्टी असल्याने बाल्कनीत खेळत होता. खेळण्याच्या नादात अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट जमिनीवर आदळला. प्रचंड उंचीवरून पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

कियांशचे वडील कामानिमित्त मनमाड येथे असतात, तर तो नाशिकमध्ये आई आणि दोन बहिणींसह राहत होता. एकुलत्या एक मुलाचा अशा अपघाती अंत झाल्याने बेदाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ​याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...