Saturday, September 28, 2024
HomeनाशिकNashik Crime News : खैरतस्कर ‘पुष्पा’ जेरबंद; वनविकास महामंडळाची कारवाई

Nashik Crime News : खैरतस्कर ‘पुष्पा’ जेरबंद; वनविकास महामंडळाची कारवाई

५ वन गुन्ह्यात हाेता पसार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’मध्ये (Pushpa) चंदन तस्कर म्हणून अल्लू अर्जुनने (Allu Arjun) नायकाची भूमिका गाजवली होती. या चित्रपटातील नायकाचे पो स्टर तसेच फोटो स्वत:च्या शर्टावर लावून महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात स्वत:ला ‘पुष्पा’ म्हणविणाऱ्या नवसुभाई हरिभाई लोहार(वय ४०, रा. गुजरात) या खैरतस्काराच्या मुसक्या आवळण्यात वनविकास महामंडळाच्या पथकाला यश आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘हाक मराठी’चा मास्टरमाईंड अटकेत

पेठ नाका (Peth Naka) येथील भरवस्तीतून सिनेस्टाईलने लोहार उर्फ ‘पुष्पा’चा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र व गुजरात सीमेवर खैर प्रजातीच्या अवैध वृक्षांची तोड करून वाहतूक करणारा खैर तस्कर नवसू याच्याविरोधात ३ वनगुन्हे दाखल होते. या वनगुन्ह्यांमध्ये तो फरार होता. गेल्या काही महिन्यात लोहार विरोधात पुन्हा दोन वनगुन्हे दाखल करून त्याचा शोध वनविकास महामंडळाकडून घेण्यात येत होता. खैर लाकडाची रातोरात गायब करणाऱ्या लोहारने अनेकदा वनाधिकाऱ्यांना चकवा दिला होता.त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी त्यांच्या अटकेसाठी कंबर कसली होती.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर भामट्यांनी डॉक्टरला घातला तब्बल ‘इतक्या’ लाखांना गंडा

अखेर लोहार पेठनाका या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आला असता वनपथक (Forest Team) त्याला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वनपथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करत लोहारला अटक केली. या कारवाईत वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिकचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजीत नेवसे व सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी, प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया, अभिषेक अजेश्र, बापू शेवाळे, राहुल वाघ आदींनी कारवाईत सहभाग घेतला. तर, जिल्हा न्यायालयाने (District Court) रविवारी (दि.२३) लोहारची रवानही कारागृहात केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Bribe News : प्रभारी सहाय्यक आयुक्त जाळ्यात

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात तस्करांकडून वनसंपदेला लक्ष केले जाते. त्यामुळे गस्तीसह तस्कारांच्या म्हो रक्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. खैरतस्कर नवसुभाईच्या अटकेमुळे खैरतस्कारांवर वचक निर्माण होईल.

रमेश बलैया, वनपरिक्षेत्र अधिकारी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या