Friday, May 3, 2024
Homeनगरदोन टेम्पोंचा भीषण अपघात; एक ठार, दोघे गंभीर

दोन टेम्पोंचा भीषण अपघात; एक ठार, दोघे गंभीर

बेलवंडी | वार्ताहर

अहमदनगर-दौंड रस्त्यावर (Ahmednagar-Daund road) चिखली घाटात (Chikhali Ghat) वळणावर दोन टेंम्पो समोरा समोर आले. चालकांचे नियंत्रण सुटल्याने भिषण अपघात होऊन एक चालक ठार तर दुसर्‍या चालकासह एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. (Accident news)

- Advertisement -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी अहमदनगर-दौंड रस्त्यावर चिखली घाटात एक टेंम्पो दौंडकडे जात होता. तर दुसरा अहमदनगरकडे (ahmednagar accident) येत होता. एमएच १६ सीसी ०२९२ व एमएच ४१ एयु २१९१ हे दोन्ही टँम्पो मुळ वळणावर समोरासमोर आल्याने वाहनचालकांचा ताबा सुटल्यामुळे दोन्ही टेम्पो समोरासमोर एकमेकांवर धडकले.

अपघात इतका भिषण होता की एका टेम्पोतील लोखंडी पोल ड्रायव्हर केबीन तोडून चालकावर कोसळले यात अडकुन पडल्याने त्याचा जागेवर मृत्यु झाला. दोन्ही टँम्पो रस्ताच्या खाली काही अंतराव दरीत कोसळले. एमएच १६ सीसी ०२९२ या टँम्पोचा चालक त्याच टँम्पोत असणार्‍या दुसर्‍या टँम्पोचा चालक व सहकारी गभीर जखमी झाल्याने त्याना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

चिखली घाटात झालेल्या या भिषण अपघाताबद्दल खबर मिळताच बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ साहेब, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, सहाय्यक फौजदार सुनिल मोरे, पोलिस नंदकुमार पठारे आदींनी घटनास्थळी तातडीने पोहचत वाहतुक सुरळीतपणे करण्यासह मृतदेह बाहेर काढण्यासाठी कार्यवाही केली. अपघाताचे मुळ कारण व अपघातातील वित्त हाणी रात्री उशिरापर्यंत समजु शकली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या