Monday, May 20, 2024
Homeधुळेचौघा संशयितांची कसून चौकशी

चौघा संशयितांची कसून चौकशी

धुळे । Dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील तरवाडे येथे माय-लेकीच्या (mother doughter’s) निर्घृण हत्येचा (brutal murder) पोलिसांकडून कसून तपास (Investigation) सुरू करण्यात आला आहे. आज दिवसभर चार संशयितांची चौकशी करण्यात आली. मात्र ठोस माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही. त्यामुळे दोघांच्या मृत्यूचे कारण (cause of death) अद्यापही गुलदस्त्याच आहे.

- Advertisement -

तरवाडे येथे हॉटेल बाहेर खाटेवर झोपलेल्या चंद्रभागा भावराव महाजन (वय 65 रा. तरवाडे ता. धुळे) व वंदनाबाई गुणवंत महाले (वय 45 रा. कासोदा, अडगाव ता. एरंडोल) या माय-लेकीची (mother doughter’s) रात्री झोपेतच धारदार हत्याराने वार करत हत्या (brutal murder) करण्यात आली. याप्रकरणी सुरेश भावराव माळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पंरतू फिर्यादीने गुणवंत चिंधा महाले, हितेश गुणवंत महाले, दिनेश गुणवंत महाले (रा. आडगाव ता. भडगाव जि. जळगाव) व नामदेव भावराव माळी (रा. तरवाडे) या चौघांवर संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक तथा तपासाधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी आज वरील चौघांची कसुन चौकशी (Investigation) केली. पंरतू ठोस माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही. त्यांची पुढेही चौकशी सुरूच राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या