सटाणा | वार्ताहर Satana
येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटयांने महिलेच्या बॅगेतील सुमारे साडेआठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माधुरी पंकज पाटील ( ३९, रा. उलवे, नवी मुंबई) या सटाणा बसस्थानक परिसरात असताना त्यांच्या ताब्यातील बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, चैन, कानातील टॉप्स तसेच सोन्याचे नाणे यांचा समावेश आहे. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ८ लाख ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार एन. आर. खैरनार करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. ही घटना गर्दीच्या वेळेत घडल्याने बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
उन्हाळी सुटीमुळे बसस्थानकात महिला, जेष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत चोरट्यांकडून गर्दीचा लाभ घेत बॅग, दागिने व मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला जात आहे. बसस्थानक तसेच परिसरात हे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे महिला प्रवाशी वर्गात कमालीची दहशत पसरली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसस्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्हीद्वारे संशयितांवर लक्ष ठेवावे, गर्दीच्या वेळेत विशेष पथक तैनात करावे तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, बाहेरगावाहून सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी येणार्या प्रवाशांनी मौल्यवान दागिने आणि रोकड ठेवू नये तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास सुरक्षित ठेवावी, अनोळखी व्यक्तींवर विश्वास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




