Sunday, November 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुणे-गुवाहाटी विमानाचे टेक ऑफ नंतर इमर्जन्सी लँडिंग; १९२ प्रवासी सुखरूप

पुणे-गुवाहाटी विमानाचे टेक ऑफ नंतर इमर्जन्सी लँडिंग; १९२ प्रवासी सुखरूप

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी पुणे विमानतळावर या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. वैमानिकाने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) याबाबत माहिती दिल्यानंतर विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या. अखेर सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. या विमानातील १९२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स अशा सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, या घटनेत
कोणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे 6E 0623 (VT-IZE) हे विमान पुण्याहून गुवाहाटीकडे जाण्यासाठी रवाना झाले होते. विमानाने टेक-ऑफ केल्यानंतर लँडिंग गियर (विमानाची चाके) आत न घेतली गेल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विमानाने तातडीने पुणे विमानतळाच्या एटीसीशी संपर्क साधून तांत्रिक बिघाडाची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे विमानतळ प्रशासन, भारतीय हवाई दल, इंडिगो आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या. विमानाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी लँडिंग गियरची प्रत्यक्ष पाहणी करता यावी, या उद्देशाने
विमानाने धावपट्टीवरून कमी उंचीवरून उड्डाण केले. त्यानंतर सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी विमानाचेपुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

खबरदारीचा उपाय म्हणून तीन अग्निशमन दलाच्या गाड्या आणि दोन रुग्णवाहिकांच्या ताफ्यासह विमानाला बे नंबर सात येथे नेण्यात आले. विमानाची
तपासणी करून ते सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी ‘फुल इमर्जन्सी’ मागे घेण्यात आली. त्यानंतर विमानाला एरोब्रिज जोडून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. विमानातील १९२ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, प्रवाशांचा पुढील

.गुवाहाटी प्रवास खोळंबू नये, यासाठी इंडिगोकडून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.

ताज्या बातम्या