Monday, June 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउडी मारण्याची धमकी देत रेल्वेस्थानकातील ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला तरुण अन….

उडी मारण्याची धमकी देत रेल्वेस्थानकातील ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला तरुण अन….

- Advertisement -

मनमाड | प्रतिनिधी Manmad

एक तरुण थेट रेल्वेच्या अतिउच्चदाब असलेल्या ओवर हेड वायरच्या पोल वर चढल्याची खळबळ जनक घटना आज(शुक्रवार)सायंकाळी रेल्वे स्टेशनच्या प्लॉट फार्म क्र.4 वर घडली.रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला.हा तरुण खाली उडी मारण्याची धमकी देता होता त्यामुळे रेल्वे पोलीस,आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.हा तरुण विद्युत तारेवर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून सर्वांची तारांबळ उडाली.अखेर एक तासाच्या अथक प्रयत्ना नंतर त्याला खाली उतरविण्यात यश आले.

या घटनेमुळे तीन रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले. तो कुठला आहे.. खंबावर कसा चढला याचा रेल्वे पोलीस आणि आरपीएफ तपास करीत आहे.

या बाबत अधिकारी वृत्त असें की रेल्वे स्थानकाच्या प्लॉट फार्म क्र.4/5 च्या दरम्यान सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एक तरुण थेट अतिउच्चदाब असलेल्या ओवर हेडच्या खांबावर चढल्याचे दिसताच प्रवाशा सोबत रेल्वे अधिकारी,रेल्वे पोलीस, आरपीएफ यांची एकच तारांबळ उडाली. हाय टेन्शन वायर पासून हा तरुण थोड्याच अंतरावर होता त्यामुळे त्याला विजेचा धक्का लागण्याची दाट शक्यता असल्याचे पाहून तातडीने त्याभागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

वीज पुरवठा खंडित होताच या तरुणाला खाली आणण्यासाठी दोन कर्मचारी खांबावर चढले त्यांना पाहून या तरुणाने खाली उडी मारण्याची धमकी देत तसं करण्याचा तो प्रयत्न करीत असल्याचे पाहून कर्मचारी थांबले आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागले मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थिती नसल्याचे पाहून तिन्ही बाजूनी इतर कर्मचारी देखील खांबावर चढले आणि अखेर एक तासाच्या प्रयत्ना नंतर या तरुणाला दोर खंडाच्या मदतीने खाली आणण्यात आले त्यामुळे त्याचा जीव वाचला.

या तरुणाने घातलेल्या गोंधळामुळे आरपीएफ, रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचारी यांची मात्र चांगलीच तारांबळ उडून त्यांचा एका प्रकारे गोंधळ उडाला होता मात्र त्याचा जीव वाचला याचे सर्वाना समाधान होते तिकडे वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे मुंबईकडे जाणारी एक आणि मुंबईकडून येणाऱ्या दोन अशा तीन रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला

ताज्या बातम्या

default-featured-image

Gokul Gite : मंत्री उदय सामंत नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंना घेऊन...

0
नाशिक | Nashik नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) निकालात महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे...