Friday, May 3, 2024
Homeजळगावशहापूरजवळील अपघातात तळेगांवचा तरूण ठार

शहापूरजवळील अपघातात तळेगांवचा तरूण ठार

तळेगाव Talegaon ता. जामनेर .|वार्ताहर
शहापूरपासून (Shahapur) जवळच असलेल्या खराडी (kharadi) येथे श्रीकृष्ण मंदिरासमोर (Shri Krishna Temple) दोन मोटरसायकल (Two motorcycles) मध्ये  समोरासमोर धडक होऊन गजानन बाबुराव माळी (वय 35) रा.तळेगाव हे जागीच ठार (Killed on the spot) झाले. तर त्यांच्यासोबत असलेले गोपाल लक्ष्मण माळी  तळेगाव हे जखमी (wounded) झाले आहेत.

दुसरा मोटारसायकलस्वार नागराज नाईक (खडकी) हेे देखील जखमी असून त्यांना उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले आहे. मयत गजानन माळी यांची आर्थिक परिस्थिती नाजुक असून ते टेलर काम करुन  आपली व कुटुंबाची उपजीविका करत होते. गजानन हा घरगुती किराणा घेण्यासाठी जामनेरला गेले होते. जामनेर वरून तळेगावला  परत येत असताना सदर अपघात घडला. त्यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी असा परिवार आहे.

- Advertisement -

घरातील कर्ता पुरुष गजानन असल्याने  संपूर्ण परिवारावर हा मोठा आघात झाला आहे. अपघाताचे वृत्त पसरताच ग्रामस्थांनी शहापूरकडे धाव घेतली. गजानन हा मनमिळाऊ व समाजकार्यात अग्रेसर असलेला तरुण असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या