येवला । प्रतिनिधी Yeola
- Advertisement -
शहरात ग्रामीण भागातील तरुणाच्या डोक्यात सिमेंटगट्टू घालून निर्घुण खून केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शनीपटांगण येथे मंगळवारी, (दि. १४) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एकनाथ बाळकृष्ण गायकवाड (वय ३८) रा. सुरेगावरस्ता ता. येवला यांचे डोक्यात एकाने सिमेंटगट्ट घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र अती रक्तस्रावाने तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून संशयीत आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.




