पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
लिफ्ट देण्याचा बहाना करून जबरी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या संशयितांकडून एक मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे मध्यप्रदेश येथील सध्या धात्रक फाटा येथील लोकमान्य हॉस्पिटल पाठीमागे राहणारे तेहतीस वर्षीय संजू कुमार राजाराम कोल हे शुक्रवार ता.१२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जत्रा चौफुली येथे घराकडे जाण्यासाठी थांबले होते. दोन अनोळखी इसम यांनी त्यांना राहते घरी सोडतो असे सांगून त्यांचे मोटार सायकल बसवून घेऊन गेले. कोल यांना दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जात मारहाण करीत खिशातील मोबाईल घेऊन पसार झाले. कोल यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठत त्याची जबरी लूट करणाऱ्या दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.
नाशिक शहरात वाढत्या जबरी लूटचे प्रकार बघता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदर गुन्हे उकल करणेबाबत संबंधित पोलिस ठाण्यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस अंमलदार सुमित शिंदे व योगेश गावित हे आडगाव परिसरात पेट्रोलिग करीत होते. फिर्यादी कोल यांनी सांगितलेल्या वर्णनाची मोटार सायकल व संशयित आढळून आले.
पोलीसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता थोड्याच अंतरावर त्यांचा पाठलाग करून संशयित गणेश शांताराम नेहरे (रा. कोर्णाक नगर आडगाव नाशिक,) संशयित शुभम अशोक मडावी (रा. कोर्णाक नगर आडगाव नाशिक) यांना ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्यांनी प्रथमतः उडवाउडविची उत्तरे दिली. मात्र, पोलिस खाक्या दाखवताच या संशयितांनी गुन्हाची कबुली दिली. या संशयितांकडून रेडमी कंपनीचा रेडमी नोट ११ टी ५जी वाय १६ फोन व गुन्हात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली.
यांनी बजाविली कामगिरी…
सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राउत, पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, पोलिस निरीक्षक दिलीप राठोड, पोलिस निरीक्षक शिवाजी आहिरे,सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे, पोलिस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलिस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, श्रीकांत महाजन, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रविंद्र लिलके, प्रितम बोराटे, दिपक भुजबळ, कुणाल राउत, योगेश गावित, मपोहवा वैशाली बच्छाव, अशांनी यशस्वी रित्या केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार इम्रान शेख करीत आहे.




