Friday, May 29, 2026
Homeनाशिकविद्युत तार अंगावर पडल्याने तरुण गंभीर जखमी

विद्युत तार अंगावर पडल्याने तरुण गंभीर जखमी

डुबेरे | वार्ताहर Dubere / Sinnar

- Advertisement -

येथुन जवळच असलेल्या कृष्णनगर (डुबेरेवाडी) शिवारात शेतात कोबीच्या पिकाला पाणी भरत असताना विद्युत वाहक तार तुटून अंगावर पडल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.6) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. राम सोमनाथ वाजे (18) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राम वाजे हा कृष्णनगर शिवारातील शेतात कुटुंबियांसह कोबीच्या पिकाला पाणी भरत असताना अचानक 11 केव्हीची विद्युत वाहक तार तुटली. जवळच असलेल्या कुटूंबातील सदस्यांनी विद्युततारांच्या घर्षणातून निघालेला आगीचा लोळ पाहून प्रसंगावधान राखत जीव वाचवला. मात्र, राम पाटाच्या पाण्यात असल्याने विद्युततार त्याच्या अंगावर पडली. विजेचा जोराचा झटका बसून तो भाजला. त्याला तातडीने उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

वीज वितरण कर्मचाऱ्याविरोधात ग्रामस्थांचा संताप
गेल्या काही महिन्यांपूर्वीच शेतातून घरी येत असताना विजेच्या खांबाचा शॉक लागून एक तरुण जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना याच शिवारात घडली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा विद्युततारा तुटून एका तरुणाच्या जीवावर बेतले. कर्मचाऱ्यांना विद्युत वाहक तारांच्या दुरुस्तीबाबत कळवूनही सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, ही गंभीर घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वीज कर्मचाऱ्याला मोबाईलवर संपर्क साधला. मात्र त्याच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले आहेत.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...