Thursday, May 2, 2024
Homeजळगावदुचाकी अपघातात तांबेपुरातील तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघातात तांबेपुरातील तरुणाचा मृत्यू

अमळनेर   Amalner

बेटावद कडुन अमळनेरकडे येत असताना जैतपिरच्या पुढे गलवाडे गावाजवळ मागून आलेल्या अज्ञात वाहनाने (unknown vehicle) धडक (Hit) दिल्याने दुचाकीस्वार (Bike rider) तरुण ठार (killed) झाल्याची घटना दि 19 रोजी रात्रीच्या सुमारास घडली.या घटनेत एक गंभीर जखमी (One seriously injured) झाला असून डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशन येथे उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

VISUAL STORY : गळ्यात नको ते घालून उर्वशी रौतेलाने केला कहर

  विशेष म्हणजे अपघातानंतर दोन्ही जण रात्रभर रस्त्याशेजारील नाल्यात पडून होते,सकाळीच ही घटना उघडकीस आली.शुभम बाविस्कर,वय 26,रा आय यु डी पी कॉलनी,तांबेपुरा असे मयत तरुणाचे नाव असून तो शहरातील शिवशंकर जनरल येथे कामाला होता,बेटावद येथे त्याचे काम असल्याने दि 19 रोजी सायंकाळी दुकान मालकाची मोटारसायकल घेत मित्र शाहिद शेख याला सोबत घेऊन तो गेला होता,तिकडून 9 वाजेला तो परत येत असताना गलवाडे गावाच्या आधी कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांना मागून धडक दिल्याने ते रस्त्यालगत दुचाकी सह नाल्यात जाऊन पडले होते,

गावठी कट्ट्यासह एकास अडावद येथून अटक

दोन्ही रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने भाऊ व मित्र परिवाराने त्यांचा त्या रस्त्यावर शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत,अखेर सकाळी 6 वाजता शौचालयास जाणाऱ्या व्यक्तींच्या ते निदर्शनास आल्याने त्यांनी 108 रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात रवाना केले,यात शुभम हा मयत झाला होता तर त्याचा मित्र शाहिद यास डोक्याला व हातापायाला फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी असल्याने त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रेम विवाह केल्याने तरुणासह कुटुंबीयांना मारहाण : गुन्हा दाखलबोगस बियाण्यांची साठवणूक भोवली

मयत शुभम याचे अमळनेर ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करून काल सकाळी शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान शुभम च्या आईचे गेल्या वर्षीच कोरोना मध्ये निधन झाले असून त्याच्या पश्चात वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे,या घटनेने तांबेपुरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विवाहांबाबत सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळाने केला हे महत्वपूर्ण ठराव…. वाचाल तर तुम्हीही कराल स्वागत

- Advertisment -

ताज्या बातम्या