मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. दावोसमध्ये ज्या कंपन्यांसोबत करार केल्याचा दावा केला जातोय, त्यातील बहुतांश कंपन्या या भारतीय आहेत. असे असताना दावोसमध्ये जाऊन करार करण्याची गरज काय? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हंटले, ऐतिहासिक गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये होईल असे म्हणत आहेत. त्यांनी ५४ MOU केले आहेत. यातील ११ विदेशी कंपन्या आहेत तर ४३ कंपन्या भारतल्या आहेत यामधील ३३ कंपन्या या महाराष्ट्रतल्या आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले. एवढ्या कंपन्या भारतातल्या आहेत तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम का नाही घेतला? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
मी देखील दावोसमध्ये जाऊन विदेशी कंपन्या आणि भारतीय कंपन्या यांच्या गुंतवणूक आणल्या. तिथे दावोसमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमधले लोक येतात आणि त्यांना भेटायची वेळ मिळते. पण या लोकांना न भेटता आपल्याच इथल्या लोकांच्या भेटी घेऊन आपला इन्वेस्टमेंटचा फुगा मोठा दिसावा असा प्रयत्न केला गेलाय. वेगवेगळ्या उद्योगपतींशी बोलणे कुठेच झाले नाही असे दिसले. दावोसच्या अर्ध्या किमतीत तुम्ही इकडेच केले असते. इथेच भेटी घेतल्या असत्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
नगरविकास खाते तिकडे असताना नगरविकास मंत्र्याना नेले नाही.उद्योगमंत्री तिकडे असताना कधी पाहिले का? मुख्यमंत्री तिथे असताना उद्योगमंत्री तिकडे उशिरा पोहोचले. तिकडे जाऊन करार करणे म्हणजे आपल्या घरचा डब्बा घेऊन जायचा आणि तिकडे खायचा असे झाल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
उद्योगमंत्री एक दिवस उशिरा पोचले दुसऱ्या दिवशी ते परत आले. एक दिवस ते कुठे गेले काय माहीत शॉपिंगला गेले असावेत तिकडे 7 अधिकारी होते पण उद्योगमंत्री असले पाहिजेत ना? का उशिरा आले? का लवकर आले? शिंदे नाराज होते म्हणून त्यांना पाठवण्यात आले. मुख्यमंत्री जर तिकडे बसत असतील तर उद्योग मंत्री का नाही बसले? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी विचारला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा