मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी व्हीप धुडकावून बंडखोरी केल्यानंतर अखेर २४ तासांनी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून थेट आणि शेलक्या शब्दांत बंडखोर खासदारांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात. तर उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये थेट ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेतले नसले तरी शिंदे गटात जाण्यासाठी वेगवेगळी कारणे देणाऱ्या खासदारांना त्यांनी लक्ष्य केले आहे.
Telegram: दिल्ली उच्च न्यायालयाचा टेलिग्रामला झटका; २२ जून पर्यंत बंदी कायम
कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले
आज आपला 60 वा वर्धापन दिन! पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती 2024 मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.




