Friday, May 3, 2024
Homeनाशिकआकाश छाजेडांची 'इंटक'च्या अध्यक्षपदी निवड

आकाश छाजेडांची ‘इंटक’च्या अध्यक्षपदी निवड

नाशिक | Nashik

महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष व महाराष्ट्र एस. टी.वर्कर्स कांग्रेस (Congress) चे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या अध्यक्षपदी अ‍ॅड. आकाश छाजेड (Aakash Chhajed) यांची सर्वानुमाते निवड करण्यात आली आहे….

- Advertisement -

महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स (इंटक) संघटनेच्या नवीन राज्य कार्यकारणीचे सदस्य तसेच विविध निमंत्रित राज्यस्तरीय पदाधिकारी, विभागीय सचिव, महिला संघटकांची बैठक आज महाराष्ट्र इंटक कार्यालय मुंबई (Mumbai) येथे कार्याध्यक्ष रमेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीत प्रथम जयप्रकाश छाजेड (Jayaprakash Chhajed) यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये रिक्त झालेल्या अध्यक्षपदी अ‍ॅड. आकाश छाजेड यांची सर्वानुमाते निवड करण्याचा ठराव संघटनेचे सरचिटणीस डी.ए.लिपणे पाटील यांनी मांडला. त्याला संघटनेचे कार्याध्यक्ष शिंदे यांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्वानुमाते तो मंजुर करण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्व पदाधिकार्‍यांनी अ‍ॅड.आकाश छाजेड यांची अध्यक्षपदी निवड करण्यास संमती दर्शविली व हात उंचावून सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर संघटनेच्या कामकाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वांनुमते नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड.आकाश छाजेड यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अ‍ॅड.आकाश छाजेड यांनीही वडिलांची कमी भासु देणार नाही. याची ग्वाही देत कामगारांच्या प्रश्नाबाबत पुन्हा नव्या ताकतीने लढ़ा पुढे चालु ठेवेल असे सांगितले.

दरम्यान, याप्रसंगी सरचिटणीस, राजाराम पवार, रामदास गवळी, मयूर फिरके, रविंद्र तवर, विजय गायकवाड़, इकबाल अहमद, रेहान शेख, श्रीकांत गोणारकर, पराग राऊत, बाळासाहेब कासार, अल्तमश शेख, सौ.संगीता फुके, एन.डी.पवार, सूर्यकांत कांदे, नारायण ठाकुर, अनिल हांडोरे, श्रीकांत येडे, के.बी.गवळी, एस.ल. मुळे, विजय जाधव, पोपट बच्छाव, अशोक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या