Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजन२८ दिवसांनी अभिषेकची करोनावर मात

२८ दिवसांनी अभिषेकची करोनावर मात

मुंबई

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याची करोना चाचणी तब्बल २८ दिवसानंतर निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याला रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

बच्चनने यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘प्रॉमिस हे प्रॉमिस असते. आज दुपारी माझी कोविड-१९ टेस्ट निगेटिव्ह आली. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की, मी याला हरवेल. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना केली याचे खूप आभार. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे खूप खूप धन्यवाद’

११ जुलैच्या संध्याकाळी अभिषेक व अमिताभ बच्चन यांना लक्षण दिसल्यानंतर रुग्णालयात गेले होते. अभिषेकने करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी ट्विटरवर दिली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

जीएसटी संकलनात मोठी वाढ

0
नवी दिल्ली ।प्रतिनिधी New Delhi मार्चमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ९.९% वाढून १.९६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले, जे आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन...