Tuesday, November 24, 2026
HomeनगरAhilyanagar : फरार, पाहिजे आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम

Ahilyanagar : फरार, पाहिजे आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम

स्थानिक गुन्हे शाखेने आठ जणांवर केली कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील फरार तसेच पाहिजे, आरोपींचा शोध घेऊन त्यांची नावे अभिलेखातून कमी करण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातही 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 ऑक्टोबर रोजी चार फरार व चार पाहिजे आरोपींविरुद्ध कारवाई केली. राज्याचे अपर पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदारांचे विशेष पथक तयार केले.

- Advertisement -

विष्णू भागवत, सागर ससाणे, रोहित येमुल, अतुल लोटके, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, संदीप पवार, राहुल द्वारके, शाहीद शेख आणि अभिजीत अरकल यांचा पथकात समावेश होता. या पथकाने फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेतला. त्यात नेवासा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरार कुणाल बापू पवार (रा. शेंडी), कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरार शिवाजी सोन्याबापू साबळे (रा. तपोवन रोड) आणि गणेश मधुकर झेंडे (रा. नालेगाव) तसेच पारनेर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अनिल रतन येणारे (रा. रांजणगाव मशीद) यांना संबंधित पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

दरम्यान, तोफखाना पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील पाहिजे आरोपी अक्षय बाबुराव धनवे, ऋतीक तुळशीराम गायकवाड आणि निखील अजय साळवे यांचे जामीन आदेश संबंधित पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील फरार आरोपी संतोष बाबुराव सोनवणे याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा मृत्यू प्रमाणपत्रासह नाव अभिलेखातून कमी करण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला. या कारवाईमुळे चार फरार आरोपी संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात हजर झाले असून, तीन आरोपींचे जामीन झाल्याचे अभिलेखावर आणण्यात आले आहे. एका फरार आरोपीच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...