Thursday, April 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदोन तरुणांचा खून करणारे फरार संशयित आरोपी जेरबंद

दोन तरुणांचा खून करणारे फरार संशयित आरोपी जेरबंद

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

पैशांच्या वादातून दोघा तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला चढवित त्यांचा निर्घृण खून करत उत्तर प्रदेश राज्यात फरार झालेल्या दोघा हल्लेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिध्दार्थनगर जिल्ह्यातील डुमरियागंज तालुक्यातील हल्लोर शिवारात दोन दिवस पाळत ठेवून शिताफीने जेरबंद करीत मालेगावी आणले. या दोघांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

- Advertisement -

सोयगाव अयोध्यानगर भागात पैशांच्या देवाणघेवाण वादातून निखिल भोला सहानी (१८) व अनीश उर्फ गालू भोला सहानी (२८, मुळ राहणार गोरखपूर, उत्तर प्रदेश) या दोघांचा रजा कैसर अब्बास (१९, रा. हल्लोर) व औन मंजूर अब्बास उर्फ ऑनभाई (२०, रा. हल्लोर) या दोघांनी धारदार शस्त्राने वार करीत त्यांचा निर्घृण खून करत पलायन केले होते. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात ८ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघा तरुणांच्या झालेल्या निर्घृण हत्त्येची जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिध्दार्थ बारवाल, दर्शन दुग्गड यांनी गंभीर दखल घेत हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथकांना सूचना दिल्या होत्या.

पोलिसांतर्फे शोध घेतला जात असतांना हे दोघे हल्लेखोर उत्तर प्रदेशात पळून गेल्याची महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली होती. यां माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, छावणी पोलीस निरीक्षक दीपक जाधव, सपोनि योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने हल्लखोर शिवारात पाळत ठेवत या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी पोलिसांनी केली असता पैशांच्या वादातून निखिल व अनीस यांची धारदार शस्त्राने वार करीत खून केल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली आहे.

ताज्या बातम्या

Narendra Modi : “नारी शक्ती वंदन विधेयकाला कुणी विरोध केला तर…”;...

0
नवी दिल्ली | New Delhi लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये (Lok Sabha and State Assemblies) महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी ‘नारी शक्ती वंदन कायदा’ (Nari...