Thursday, June 18, 2026
HomeनगरAccident News : खंडाळ्यातील अपघातात श्रीरामपूरचा तरुण ठार

Accident News : खंडाळ्यातील अपघातात श्रीरामपूरचा तरुण ठार

खंडाळा |वार्ताहर| Khandala

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा-नांदूर दरम्यान झालेल्या कंटेनर व दुचाकीच्या अपघातामध्ये श्रीरामपूरचा तरुण ठार झाल्याची घटना घडली. आज शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूरकडून संगमनेरकडे निघालेल्या ( एम.एच.14 एच.जी. 8314 ) या क्रमांकाच्या कंटेनरची बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे येणार्‍या युनिकॉन (एम.एच.17 बी.टी. 4029 ) दुचाकीची धडक झाली.

- Advertisement -

यामध्ये मोटार सायकलवरील मनिष सुरेश गायकवाड (वय 26 ) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला.जखमीला स्थानिक तरुणांनी तातडीने कामगार रुग्णालयात पाठविले. अपघात घडल्याचा आवाज मोठा असल्याने परिसरातील ग्रामस्थ अपघातस्थळी गेले. दुचाकी चालकाच्या डोक्यावर हेल्मेट असूनही डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर मार लागला.

तसेच मॅकव्हिलचे तुकडे झाले.अपघात घडताच कंटेनरचा चालक पसार झाला. दुपारी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक श्री.परबत व किशोर औताडे करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...