नवी दिल्ली | New Delhi
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने डिलिमिटेशनशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली असून, लोकसभेच्या जागांमध्ये सर्व राज्यांसाठी समान ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या नव्या प्रस्तावानुसार राज्यांचे लोकसभेतील सध्याचे प्रतिनिधित्वाचे प्रमाण कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभेची सदस्यसंख्या सध्याच्या ५४३ वरून वाढून ८५० पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे महिला आरक्षणाची अंमलबजावणी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना वेग मिळाला आहे.
लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८१५ ते ८५० पर्यंत?
केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांमध्ये सर्व राज्यांसाठी समान ५० टक्के वाढ करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. सध्याच्या ५४३ निवडून येणाऱ्या सदस्यसंख्येत ५० टक्के वाढ झाल्यास लोकसभेची संख्या सुमारे ८१५ पर्यंत पोहोचू शकते. घटनात्मक तरतुदींमध्ये कमाल सदस्यसंख्येची मर्यादा ८५० पर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव असल्याने, नव्या रचनेत जागांची संख्या वाढवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
डिलिमीटेशन म्हणजे नेमकं काय?
डिलिमिटेशन म्हणजे लोकसंख्येतील बदलानुसार लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा आणि जागांची संख्या पुन्हा निश्चित करण्याची घटनात्मक प्रक्रिया होय. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या प्रक्रियेला मराठीत ‘मतदारसंघ पुनर्रचना’ असे म्हणतात. नवीन जनगणनेची वाट न पाहता २०११ च्या जनगणनेच्या किंवा सरकारने निश्चित केलेल्या आकडेवारीच्या आधारे ही पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे.
नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा 2023
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना ३३ टक्के आरक्षण देत २०२३ मध्ये कायदा करण्यात आला. सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेने १०६ वी घटनादुरुस्ती मंजूर केली, ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असे नाव देऊन हा कायदा करण्यात आला. त्यानुसार, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, ही आरक्षणव्यवस्था जनगणना आणि त्यानंतरच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू होणार होती. त्यामुळे, 2029 च्या निवडणुकीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याबाबत अनिश्चितता आहे. कारण, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक गतवेळी मंजूर झाले नसल्याने आता पुन्हा एकदा सरकारकडून हे विधेयक मंजूर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
VIDEO | Delhi: The Union Cabinet met here on Friday and is learnt to have cleared a fresh delimitation-linked women’s reservation bill, which is likely to be brought before the special sitting of Parliament beginning next week.
Sources said the bill was brought before the special meeting of the Union Cabinet, which is expected to accord its nod to the fresh bill with some amendments to ensure that no state loses its representation in the Lok Sabha in proportion to other states after delimitation.
The Cabinet meeting was chaired by Prime Minister Narendra Modi and was convened at 1 pm at Sewa Teerth to discuss the bill, which the government is keen to get passed in the special sitting of Parliament starting Monday.
Source: PMO— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2026
विरोधकांनी सूचवलेल्या दुरुस्त्या केल्या मान्य
दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाला मान्यता देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने विरोधकांनी सूचवलेल्या काही दुरुस्त्यांचा स्वीकार करत त्यातत काही महत्त्वाचे बदल केले आहे. आता लोकसभेत नव्याने मांडण्यात येणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकामधील तरतुदीनुसार देशातील प्रत्येक राज्यामधील लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये सरसकट ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे लोकसभेतीव मतदारसंघांची संख्या वाढून ती ८१५ पर्यंत पोहोचणार आहे.
मोठी बातमी! डिलिमीटेशन विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी; लोकसभेच्या किती जागा वाढणार?
संसदेतील सध्याचे एनडीएचे संख्याबळ
डिलिमिटेशन विधेयकावर मतदान करण्यासाठी सभागृहात दोन-तृतीयांश बहुमताची गरज आहे. लोकसभेत सध्या ५४३ जागा आहेत. त्यापैकी ३ जागा रिक्त आहेत. म्हणजे सध्या ५४० खासदार आहेत. ५४० च्या दोन-तृतीयांश म्हणजे ३६० खासदारांचा पाठिंबा या विधेयकाला मंजूर करण्यासाठी लागेल. सध्या भाजप प्रणित एनडीएकडे ३२० खासदार आहेत.
भाजप: २४१
तेलुगू देसम पक्ष: १६
शिवसेना (एकनाथ शिंदे): १३
जनता दल (युनायटेड) : १२
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) : ५
जनता दल (धर्मनिरपेक्ष) : २
जनसेना पक्ष : २
राष्ट्रीय लोकदल (RLD) : २
अपना दल (एस) : १
आसाम गण परिषद : १
एजेएसयू पक्ष : १
हिंदुस्तानी अवाम मोर्चा : १
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : १
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा : १
यूपीपीएल : १
एनसीपीआय (तृणमूलमधून बाहेर पडलेले) : २०
शिरोमणी अकाली दल : १
एकूण ३२१
एनडीएबाहेरील संभाव्य समर्थक (मागील वेळी मदत केलेले)
- वायएसआर काँग्रेस – ४
- अपक्ष – १
- हे धरून एकूण संख्याबळ – ३२६ पर्यंत पोहोचते.
एनडीएला द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे समर्थन मिळाल्यास भाजपला बहुमताचा आकडा गाठणे सोपे होणार आहे.
- द्रमुक – २२
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – ८
- एकूण संभाव्य म्हणजे एकूण संख्याबळ – ३५६




