Saturday, November 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident : कंटेनर-कार अपघातात चौघांचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी

Accident : कंटेनर-कार अपघातात चौघांचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी

मनमाड | प्रतिनिधी Manmad

- Advertisement -

पुणे-इंदौर महामार्गाने वेगात जाणार्‍या कंटेनर व झायलो कारची समोरासमोर धडक होवून झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला. शहराजवळील अनकवाडे शिवारात झालेल्या या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोघा महिलांचा समावेश आहे. मयत उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील असून ते विवाह सोहळा आटोपून परततांना हा अपघात झाला.

एमएच-१२-एफयु-३७६४ या झायलो कारने हाफीसजुंनीसा अब्दुल हकीम (२०), कली मुन्नीसा कमाल अहमद (३५), मोहम्मद अहसान कमाल अहमद (५७), मोहम्मद झीशन कमाल अहमद, नसीबुनिसा अब्दुल हकीम (५५), रिझवान अहमद शकील अहमद (३७), चांद बाबू हसीम अली शेख (१४)आणि समीम शेख (१२) चालकासह असे एकूण ९ जण श्रीरामपूर येथून उत्तर प्रदेशाच्या गोंडा जिल्ह्याकडे जात होते. सकाळी शहरापासून ४ किमी अंतरावर अनकवाडे शिवारात रेल्वे ब्रिज समोरून येणार्‍या एचआर-४७-एच-७५५० या कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. समोरासमोर झालेल्या अपघातात कली मुन्नीसा कमाल अहमद, हाफिजुन्नीसा अबम्दुल हकीम, निजाम नियाज शेख (रा. श्रीरामपुर), शकीला कल्लू शेख (उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला.

या अपघातात मोहंमद एहसान कमाल अहमद मोहंमद जिशान कमाल अहमद, रिजवान अहमद शकील अहमद, चाँद बाबू हसीम अली, शमीम अब्दुल शेख, नसीबुन्नीसा अब्दुल हकीम, काशीराम भगवानसिंग हे गंभीर जखमी झाले. जखमींना मनमाड, येवला व मालेगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार आणि कंटेनर दोन्ही वाहने पलटी झाली.

कंटेनरची धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आहे. कार मधील ९ पैकी ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सर्व जण लग्न सोहळ्यासाठी नातेवाईकांकडे आले होते. लग्न सोहळा आटोपून परत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरीकांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले.

ताज्या बातम्या

‘राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू...

0
पंढरपूर | जिमाका वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...