Saturday, November 21, 2026
HomeनगरAccident News : संवत्सर शिवारात कार व दुचाकीचा भीषण अपघात

Accident News : संवत्सर शिवारात कार व दुचाकीचा भीषण अपघात

दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून काम आटोपून जुन्या मुंबई-नागपूर महामार्गाने (Mumbai-Nagpur Highway) संगमनेरकडे परतणार्‍या दुचाकीला समोरून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात (Car And Bike Accident) झाला. शुक्रवारी (20 नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील कांदा मार्केटजवळ ही घटना घडली. या अपघातात अमोल रुखारी आणि महेश कु-हे यांचा मृत्यू (Death) झाला, तर कुणाल शांताराम धोकरट गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मदत न करताच कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargaon Police Station) अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल रुखारी यांच्या मालकीच्या हिरो होंडा एचएफ डिलक्स (क्रमांक एमएच 15 डीझेड 3789) या दुचाकीवरून अमोल रुखारी, कुणाल शांताराम धोकरट आणि महेश दिनकर कु-हे हे तिघे छत्रपती संभाजीनगर येथील खाटूश्याम मंदिरात ड्युटी करून संगमनेरकडे (Sangamner) घरी परतत होते. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांची दुचाकी संवत्सर (Sanvatsar) येथील वैजापूर रोडवरील कांदा मार्केटजवळील कृषी केंद्रासमोर आली असता, समोरून येणार्‍या राखाडी रंगाच्या मारुती स्विफ्ट कारने (क्रमांक एमएच 02 सीपी 8738) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

कारचालकाने सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवून अपघात घडविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक उद्धव डमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : गोशाळांच्या जमीन व्यवहारासाठी कृषी दर; महसूलमंत्री बावनकुळे यांची...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai गोशाळांसाठी जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरार करताना आता कृषी दर लागू होणार असून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री...