Saturday, November 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुचाकी आणि कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

दुचाकी आणि कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

पंचाळे । वार्ताहर Panchale

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात सिन्नर तालुक्यातील सोमठाणे व मऱ्हळ येथील दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवार (दि. 20) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संवसर गावाजवळील कांदा मार्केट परिसरात दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे सोमठाणे व मऱ्हळ परिसरात शोककळा पसरली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील खाटूश्याम मंदिरात होमगार्डचे काम आटोपून संगमनेर येथे परतत असताना सोमठाणे येथील कुणाल शांताराम धोकरट, अमोल मधुकर रुकारी (28) आणि मऱ्हळ येथील महेश दिनकर कुऱ्हे (31) हे तिघे मोटारसायकल क्र. एमएच 15 टीझेड 3789 वरून वैजापूर मार्गे प्रवास करत होते. यावेळी संवसर गावालगत कांदा मार्केटजवळ राखाडी रंगाच्या मारुती स्विफ्ट कार क्र. एमएच 02 सीपी 8738 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात अमोल रुकारी आणि महेश कुऱ्हे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कुणाल धोकरट गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालकाने सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे, बेदरकार व मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने भरधाव वेगात रॉंग साइडने वाहन चालवून दुचाकीला धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.

ताज्या बातम्या

राज्य नाट्य स्पर्धा : ‘आल्तू-जलाल्तू’ने उडवले हास्याचे फवारे

0
- संदीप जाधव स्वतःचे घर असणे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. जीवनाच्या संघर्षातून, कष्टातून उभारलेल्या घराशी एक वेगळेच बंध तयार झालेले असतात. वास्तूवर आपण जसा...