Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशAccident News : महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू,...

Accident News : महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, १९ गंभीर

मृतदेह बाहेर काढण्यासाठी लागले अडीच तास

नवी दिल्ली | New Delhi

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये बोलेरोनो बसला (Bolero and Bus Accident) धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू (Death) झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू असून अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज (Prayagraj) येथील मिर्जापूर हायवेवर मेजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री बोलेरो आणि बस यांची समोरासमोर धडक झाली. हे भाविक महाकुंभमेळ्यात (Maha Kumbh Mela) संगम स्नान केल्यानंतर वाराणसीला निघाले होते. त्यावेळी मध्यरात्रीच काळाने घाला घातला. या अपघातानंतर सर्व जखमींना रामनगर सीएचसी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर बसमधील जखमी भाविक मध्य प्रदेशमधील राजगढ येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, यमुनापारचे एसपी विवेक यादव यांनी माहिती देतांना सांगितले की,”सर्व पुरुष बोलेरोमध्ये प्रवास करत होते. त्याचा वेग खूप जास्त होता. बस चालकाने ब्रेक लावला, मात्र समोरून येणारी बोलेरो बसला धडकली. मृत हे कोरबा पास आणि जांजगीर चंपा जिल्ह्यातील रहिवासी होते. दोन कुटुंबातील सदस्य एकत्र आले होते. जखमींना रामनगर सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर प्राथमिक उपचार (Treatment) केल्यावर सर्वांना स्वरूप राणी रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

बोलेरो गॅस कटरने कापली

अपघातग्रस्त बोलेरो कार गॅस कटरने कापून बाहेर काढण्यात आली. तर प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ” अपघातातील धडकेचा आवाज ऐकून आम्ही धावत तिथे पोहोचलो. बोलेरोमध्ये मृतदेह (Dead Body) अडकल्याचे पाहिले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस गॅस कटर आणि रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. बोलेरो गॅस कटरने कापण्यात आली. त्यानंतरच मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी अनेक मृतदेह विद्रुप झाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...