नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील पुनतगाव फाटा येथे बुलेटला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील तीन तरुण बुलेट मोटारसायकलवरुन नेवासा कडून श्रीरामपूरकडे येत होते. पुणतगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
- Advertisement -
अपघात एवढा भीषण होता की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.




