Tuesday, October 6, 2026
Homeनगरदोन कारच्या धडकेत वृध्द महिलेचा मृत्यू

दोन कारच्या धडकेत वृध्द महिलेचा मृत्यू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दोन कारची धडक होऊन झालेल्या अपघातात एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला. पुष्पा पोपटराव गवारे (वय 55 रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे. अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील धनगरवाडी (ता. नगर) शिवारात हॉटेल स्वागत समोर 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी 31 डिसेंबर 2024 रोजी दुपारी कार (एमएच 32 एएस 7699) वरील चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रताप पोपटराव गवारे (वय 29 रा. जेऊर बायजाबाई) यांनी फिर्याद दिली आहे. प्रताप गवारे हे त्यांच्या कार (एमएच 16 बीवाय 3757) मधून त्यांच्या आईला घेऊन अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्याने जात असताना धनगरवाडी शिवारात हॉटेल स्वागत समोर रस्ता ओलांडत असताना अहिल्यानगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणार्‍या कार चालकाने प्रताप यांच्या कारला धडक दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार थोरवे करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...