अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत घेत निवडणुकीतील उत्सुकता वाढवली. दरम्यान, उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी तीनपर्यंत विक्री झालेल्या अर्जांपैकी 369 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.
दरम्यान, अखेरच्या दिवशी सकाळपासून नगरमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडल्यामुळे जिल्ह्याच्या नजरा नगरकडे लागल्या होत्या. बँकेची निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात माजी खा. सुजय विखे पाटील, आ. विठ्ठलराव लंघे, संचालक गणपतराव सांगळे, राहुल जगताप, प्रतिभा पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, माजी बँकेचे माजी संचालक अमित भांगरे, प्रशांत लोखंडे, आ. मोनिकाताई राजळे, आ. अक्षय कर्डिले, सत्यजित कदम, संगमनेर रणजीत देशमुख, मधुकर नवले, माजी आमदार तथा बँकेचे माजी चेअरमन शंकरराव गडाख, करण ससाणे, अरुण मुंडे, श्रीगोंद्यातून प्रतापसिंग पाचपुते, नगर तालुक्यातून शरद झोडगे, शेवगावमधून हर्षदा काकडे, श्रीरामपूरमधून माजी संचालक भानुदास मुरकुटे, नीरज मुरकुटे यांच्यासह दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने जिल्हा बँकेच्या नगरमधील चाहूराणा शाखेत मोठ्या संख्येने इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. उमेदवारी दाखल करण्यासाठी दुपारी तीनची वेळ होती. ही वेळ संपल्यानंतर देखील मोठ्या संख्येने इच्छुक व त्यांचे समर्थक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे यांनी दुपारी तीन वाजता निवडणूक कार्यालयात हजर असणार्या इच्छुकांना आतमध्ये घेत कार्यालयाचा दरवाजा बंद केला. तसेच कार्यालयात असणारे इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले ही प्रक्रिया निवडणुकीची वेळ संपल्यानंतर सुमारे अर्धा तास सुरू होती.
सोसायटी मतदारसंघ
अकोले– किरण लहामटे, शरद चौधरी, संजीवनी शिंदे, सिताराम गायकर, बाळासाहेब भोर, रावसाहेब वाकचौरे, कैलास वाकचौरे, वैभव पिचड, विकासराव शेटे, मधुकर नवले, चंदर बांडे. जामखेड- सचिन घुमरे, अमोल राळेभात, सुधीर राळेभात. कर्जत – तुषार पिसाळ, अंबादास पिसाळ, देविदास देशमुख, मंगेश जगताप, मंजुषा गुंड, ज्योती शिंदे, तुषार पिसाळ, सुरेश साळुंखे, किरण पाटील, काकासाहेब तापकिर, कैलास शेवाळे. कोपरगाव- संजय शिंदे, अनिल कदम बिपिनदादा कोल्हे, विवेक कोल्हे. नगर- बाळासाहेब हराळ, प्रताप शेळके, अक्षय कर्डिले. नेवासा-शंकरराव गडाख. पारनेर- गीतांजली शेळके, काशिनाथ दाते, निलेश लंके, राहुल शिंदे. पाथर्डी-मोनिका राजळे, कडूचंद शेटे, ऋषिकेश ढाकणे. राहाता- एकनाथ घोगरे, सुजय विखे पाटील, भास्करराव खर्डे. राहुरी- प्राजक्ता तनपुरे, हर्ष तनपुरे, भाऊसाहेब लोंढे, सत्यजित कदम. संगमनेर- रणजीतसिंह देशमुख, चित्रा गायकवाड. शेवगाव- राजश्री घुले, चंद्रशेखर घुले. श्रीगोंदा- राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अर्चना पानसरे, दत्तात्रय पानसरे, प्रणिती जगताप, अण्णासाहेब शेलार, बबनराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, सुधीर नलगे, अनुराधा जगताप, संध्या महांडुळे, प्रवीणकुमार नहाटा, साक्षी भोस. श्रीरामपूर- करण ससाणे, सोन्याबापू शिंदे, रणजीत बनकर, सोपानराव राऊत.
अनुसूचित जातीजमाती- किरण लहामटे, तुकाराम मेंगाळ, प्रकाश सदाफुले, वैभव पिचड, विजय पाटोळे, प्रशांत लोखंडे, बाळासाहेब गंभीरे, मंगल शेलार, सुहास धीवर, प्रशांत लोखंडे, पंढरीनाथ इल्हे, अनिल भांगरे, वसंत कांबळे, सुधाकर भांगरे, रावजी मधे, विकास गायकवाड, अजिंक्य बोरूडे. ओबीसी- प्रशांत गायकवाड, आजिनाथ हजारे, अण्णासाहेब शेलार, शरद चौधरी, करण ससाणे, नितीन खेतमाळीस, अंकुश शेळके, कडूचंद शेटे, केशव बेरड, शंकर साठे, शिवाजी मते, अर्चना पानसरे, अश्विनी देशमुख, अनिल शिरसाठ, सुखदेव बागल, अकुंश शेळके, दादासाहेब सोनमाळी, कारभारी जावळे, कर्डिले रोहिदास, जालिंदर वाकचौरे, दिलीप रासकर, शिवदास गुंजाळ, प्रवीण लोखंडे, परीक्षित भोर, नितीन बेलेकर, विठ्ठलराव लंघे, बाळासाहेब देशमुख, अर्जुनराव बोरुडे, भानुदास मुरकुटे, रणजीत बनकर नीरज मुरकुटे, शितल म्हस्के, बाळासाहेब नाईकवाडी, किरण पाटील, मंजुषा गुंड योगिता ताठे, सत्यजित कदम, रघुनाथ मांडगे.
शेतीपूरक- राजेंद्र नागवडे, गंगाराम धुमाळ, रामदास आंब्रे, प्रकाश नाईकवाडी, सदाशिव पोखरकर, आशुतोष काळे, रावसाहेब वाकचौरे, अंकुश शेळके, विक्रम देशमुख , गंगाराम धुमाळ, भानुदास डोंगरे, त्र्यंबकराव सरोदे, देविदास देशमुख, राजेंद्र जाधव, दत्ता पानसरे, रामदास आंब्रे, दादासाहेब सोनमाळी, रोहिदास कर्डिले, संदीप शेनकर, अंकुश शेळके, विनोद बेलेकर, मधुकर नवले, जयश्री गिरवले, बाळासाहेब देशमुख, शंकर वाळेे, वैभव पिचड, जनार्दन जगताप, रत्नमाला लंघे, सुधीर म्हस्के, शकुंतला चौधरी, दादासाहेब चितळकर, हर्षदा काकडे, रघुनाथ मांडगे. बिगर शेती मतदारसंघ- धनलक्ष्मी हजारे, प्रशांत गायकवाड, संजयकुमार कर्नावट, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाईकवाडी, परिघा आरोटो, अविनाश कानवडे, संजय भळगट, नंदकुमार औताडे, वसंत लोढा, सचिन देसरडा, जनार्दन पठारे, अशोक थोरे, अमोल गर्जे, शंकर साठे, शरदराव थोरात, प्रियंका देशमुख, भाऊपाटील नवले, हाशमभाई पटेल, सुभाष गीते, दत्ता पानसरे, सचिन जगताप, रावसाहेब रोहकले, तुकाराम गुंजाळ, धनंजय गाडेकर, दिलीप रासकर, प्रणोती जगताप, रामनाथ गोल्हार, शामराव वागस्कर, प्रवीण लोखंडे, प्रतापसिंह पाचपुते, मधुकर नवले, प्रतिभा पाचपुते, बादशाह गुंजाळ, शरद झोडगे, राजेंद्र बरबडे, बापूसाहेब नेटके, वैभव पिचड, बाळासाहेब नाईकवाडी, बाळासाहेब तरटे, दीपक कुर्हाडे, पठाण अब्दुलमजीद. महिला राखीव- मंजुषा गुंड, चंदा गर्जे, अनुराधा नागवडे, सुवर्णा लहामगे, संजीवनी शिंदे, सोनल गायकवाड, जयमाला सोलेपाटील, रेखा नवले, शैलजा लोटके, संगीता वाघ, अश्विनी देशमुख, शारदा वाकचौरे, विद्या काळे, रूपाली लुणीया, ज्योती गोलेकर, शारदा खुळे, मनीषा राळेभात, सुप्रिया पाटील, प्रियंका देशमुख, अर्चना पानसरे, लिना ढोकणे, मीनाक्षी साळुंखे, पुष्पा गायकवाड, रत्नमाला उगले, भाग्यश्री राक्षे, शैलजा धुमाळ, सविता वैद्य, सुवर्ण कर्डिले, वैशाली देवडे, मंगल शेलार, रेखा नवले, चंद्रकला गंगावणे, प्रतिभा पाचपुते, संगीता वाघ, जयश्री गिरवली, सुनीता भांगरे, शितल म्हस्के, मनीषा बनकर, चंदा गर्जे, योगिता पाटील, गीतांजली शेळके, मृणाली शेलार, सुवर्णा पाचपुते, शकुंतला चौधरी, संध्या महांडुळे, योगिता ताठे विजयालक्ष्मी फाळके.
एनटी- सुनिता नगरे, अशोक महारनवर, ऋषिकेश ढाकणे, अशोक थोरे, शामराव मुर्तडक, राजेंद्र कोळपे, सुखदेव तिखोने, लक्ष्मण बोठे, सुभाष गीते, सुवर्णा लहानगे, अमोल गर्जे, तुकाराम गुंजाळ, पोपट शेंडगे, ऋषिकेश ढाकणे, गणपतराव सांगळे, अरुण मुंडे, रामनाथ गोल्हार, बाबासाहेब गर्जे, राजू जोखर, अशोक महारनवर, सोपानराव राऊत, भगवान गंगावणे, दीपक कुर्हाडे आणि दादासाहेब चितळकर यांचा समावेश आहे.




