Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik News : पोलीस भरतीतील मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू

Nashik News : पोलीस भरतीतील मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवाराचा अपघाती मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहर पोलिस (City Police) दलातील शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या भरतीतील मैदानाची चाचणीसाठी जाणाऱ्या कोपरगावातील तरुणाचा अपघाती मृत्यू (Accidental Death) झाला. मोठ्या मेहनतीने पोलीस हाेण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या तरुणाचा नियतीने काही क्षणांत घात केल्याने शाेक व्यक्त केला जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : घरझडतीत दीड लाखांचा गुटखा जप्त

याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल रामदास चरमळ (वय २२, रा. करंजी, कोपरगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी पहाटे ताे काेपरगाव येथून दुचाकीवरुन नाशिककडे (Nashik) येण्यासाठी निघाला. पहाटे पाच वाजता ताे नांदूर नाका सिग्नलजवळ आला असता, एका ट्रकने त्याच्या दुचाकीला (Bike) धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू (Death) झाला.

हे देखील वाचा : Nashik News : नाशकात डेंग्यू रुग्णसंख्या दोनशे पार

जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी (Police) केलेल्या नोंदीनुसार, कुणाल हा त्याच्या दुचाकीवरुन सोमवारी (दि. २४) पहाटे पाच वाजता प्रवास करीत होता. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरुन कुणाल हा हिरावाडीतल्या मिनाताई ठाकरे स्टेडिअमकडे जात होता. त्यावेळी नांदूर नाका सिग्नलजवळ त्याला अज्ञात ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरुन खाली पडलेला कुणाल गंभीर जखमी झाला. त्याला धीरज अरुण गायकवाड यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुणाल याला मयत घोषित केले.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यातील नऊ धरणे कोरडी; पाणीसाठा ७.६८ टक्क्यांवर

दरम्यान, याप्रकरणी आडगाव पोलिसांत (Aadgaon Police) आकस्मिक मृत्यू नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी ट्रकचा क्रमांक शोधण्यासह चालकाची माहिती काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार आडगाव पोलिसांत संशयित ट्रक चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे आडगाव पोलिस सीसीटीव्ही व इतर विश्लेषणानुसार तपास करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या