Thursday, July 4, 2024
HomeनाशिकNashik News : बँकेचे स्थलांतर थांबविण्यासाठी खातेधारकांचे आंदोलन

Nashik News : बँकेचे स्थलांतर थांबविण्यासाठी खातेधारकांचे आंदोलन

कोहोर | वार्ताहर | Kohor

- Advertisement -

पेठ तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) कोहोर ही शाखा नजिकच्या बँक ऑफ महाराष्ट्र या करंजाळी शाखेत जोडण्यात येणार असल्याची नोटीस (Notice) कोहोर बँकेच्या (Kohor Bank) नोटीस बोर्डवर जाहीर केल्याने खातेदारकांमध्ये संतोष निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी, अबाल वृद्धांसह शालेय मुलांनी आज मंगळवार (दि. २५) रोजी कोहोर बँकेसमोर आंदोलन केले.

हे देखील वाचा : Nashik Sinnar News : रिंगण सोहळ्याने फिटले भाविकांच्या डोळ्यांचे पारणे

पेठ तालुक्यातील (Peth Taluka) बँक ऑफ महाराष्ट्र कोहोर ही शाखा महत्वाची आहे. या बँकेला कोहोर परिसरातील जवळपास १६ ग्रामपंचायतमधील ५० ते ६० गावे जोडली आहेत. कोहोर बँकेला जोडलेल्या सात ते दहा हजार खातेदार सभासद असून निराधार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांचे खाते आणि विशेष करून सर्व शेतकऱ्यांची खाती या शाखेत जोडलेली आहेत. कोहोर बँक ही ग्रामीण भागात असून जर बँक ऑफ महाराष्ट्र करंजाळी शाखेस स्थलांतर झाली तर कोहोर (Kohor) परीसरातील खातेधारक, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना करंजाळी शाखेस ३० ते ३५ किलोमीटर अंतर जावे लागणार आहे.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यातील नऊ धरणे कोरडी; पाणीसाठा ७.६८ टक्क्यांवर

कोहोर परिसरातील खातेदारकांना (Account Holder) करंजाळी (Karnjali) येथील बँकेत वेळ व आर्थिक नुकसान होईल व ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांचे हाल होतील. त्यामुळे कोहोर बँक ही कोहोर येथेच असावी. बँक स्थलांतरित करू नये, व जोपर्यंत बँक स्थलांतरितचा निर्णय रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्णय कोहोर परिसरातील खातेदार व नागरिकांनी घेतला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या