Friday, May 3, 2024
Homeनाशिकआरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

नाशिक | Nashik

घरात शिरुन अल्पवयीन मुलीस दमदाटी करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास नराधमास न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावास (Rigorous imprisonment) व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रवींद्र वाळू मोरे असे या संशयिताचे नाव आहे. दिंडोरी पोलिस ठाण्याच्या (Dindori Police Station) हद्दीत ऑक्टोबर २०१६ मध्ये हा प्रकार घडलेला होता.

- Advertisement -

पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, आरोपी रवींद्र मोरे हा २९ ऑक्टाेबरला बळजबरीने घरात शिरला. त्याने पीडितेस जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. पीडितेचा भाऊ तेथे आला असता आरोपीने तेथून पळ काढला. त्यानंतर पुन्हा तो घरी आला व त्याने पीडितेच्या भावाला शिवीगाळ, धक्काबुक्की केली.

याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात आरोपी रवींद्र विरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दिपशिखा भीडे यांनी युक्तीवाद केला. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. आरोपी रवींद्र विरोधात गुन्हा शाबित झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी रवींद्रला दहा वर्षे कारावास व दंड ठोठावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या