Friday, May 3, 2024
Homeनाशिकदिंडोरी : मास्क न वापरणार्‍या ४१ नागरिकांवर कारवाई

दिंडोरी : मास्क न वापरणार्‍या ४१ नागरिकांवर कारवाई

दिंडोरी | Dindori

दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने करोना प्रतिबंधासाठी मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करुन एकाच दिवशी ४१०० रुपये दंड वसूल केला आहे.

- Advertisement -

सध्या दिंडोरी शहरात करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गावागावातूनही अनेक नागरिक दिंडोरी येथे येत असल्याने अनेकदा करोनाचा संसर्ग वेगाने होत असतो. गेल्या १५ दिवसात रुग्ण संख्या झपाट्याने वाढली.

आज दिंडोरी शहरात सुमारे ११५ च्या पुढे रुग्ण आढळले आहे. काही दुकानदार पॉझिटिव्ह सापडले तरीही त्यांनी दुकाने सुरु ठेवली आहे. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

प्रशासनाने अनेक उपाययोजना गेल्या चार ते पाच महिन्यात राबविल्या आहेत. परंतु तरीही जनता पाहिजे तशी खबरदारी घेताना दिसत नाही. बाजार पटांगणातही गर्दी होते. मुख्य चौकातही अनेक ग्रामस्थ गर्दी करुन राहतात. व्यवहार करताना मास्कचा वापर होत नसल्याने अखेरीस नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, प्रशासकीय अधिकारी प्रशांत पोतदार, कर निरीक्षक प्रदिप मावळकर, नगर अभियंता धीरज भामरे, स्थापत्य अभियंता सुनील पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने कार्यवाही केली. सुमारे ४१ नागरिकांना मास्क न घातल्याने १०० रुपये दंड आकारण्यात आला.

नागरिकांनी कोणत्याही परिस्थिती घराबाहेर पडताना मास्क वापरावा व व्यवहार करताना गर्दी करु नये, दिंडोरी शहर करोनामुक्त करण्यासाठी प्रयंत्न करावे असे आवाहन नगराध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केले आहे.

मोहिम यशस्वीतेसाठी तानाजी निकम, अमोल मवाळ, राजेंद्र खिरकाडे, ईश्वर दंडगव्हाण, सागर भदाणे, रामनाथ चारोस्कर आदी सेवक परिश्रम घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या