Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याखतांचा काळाबाजार झाल्यास अधिकार्‍यांवर कारवाई

खतांचा काळाबाजार झाल्यास अधिकार्‍यांवर कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येत्या खरीप हंगामात ( kharif season ) जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध झाली पाहिजे, यादृष्टीने नियोजन करावे. तसेच खते(Fertilizers, ), बियाणे यांचा काळाबाजार झाल्यास अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar ) यांनी दिला आहे.जिल्ह्यातील खत उपलब्धतेच्या आढाव्यात त्या बोलत होत्या.

- Advertisement -

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यातच युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांसाठीचा कच्चामाल आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे यावर्षी खतांच्या निर्मितीवर परिणाम होऊन खतांची टंचाई जाणवत आहे. या खरीप हंगामात खतपुरवठ्याचे योग्य नियोजन करून साठेबाजी व काळाबाजार याला आवर घालण्यासाठी सरकार पातळीवरून नियोजन सुरू आहे. दरवर्षी नेमकी शेतकर्‍यांना गरज असतानाच खते, बियाणांचा तुटवडा समोर येतो. यंदा अशा प्रकारची बाब कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचे ना.पवार यांनी अधिकार्‍यांना स्पष्टपणे सांगितले.

यावेळी जिल्हा विकास अधिकारी रमेश शिंदे, मोहीम अधिकारी अभिजित जमघडे यांनी यावर्षी कृषी विभागाने केलेली मागणी मंजूर झालेले आवंटन व मे महिन्यात प्राप्त झालेली खते यांची माहिती दिली.

गैरसोय टाळण्यासाठी दर महिन्याचा प्रत्येक जिल्ह्याला मिळालेला साठा आणि मंजूर आवंटन यांचा आढावा कृषी आयुक्तालय स्तरावरून घेतला जात आहे. या परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खतांची चणचण भासू नये, यासाठी डॉ. पवार यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून खते उपलब्धतेचा आढावा घेतला.आवंटनापेक्षा कमी खते उपलब्ध झाले आहेत.

या महिन्यात मंजूर आवंटनापेक्षा कमी खते उपलब्ध झाल्याची कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली. याबाबत मागणीचे पत्र द्या, गरज पडल्यास केंद्रीय खते व रसायनमंत्र्यांकडे पाठपुरावा करीन, असेही डॉ.भारती पवार यांनी सांगितले.मात्र,कोणत्याही परिस्थितीत खते व बियाणे यांचा काळाबाजार होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या