Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनियम तोडणार्‍या वाहनधारकांवर कारवाई

नियम तोडणार्‍या वाहनधारकांवर कारवाई

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

सिन्नर पोलिस ठाण्याकडून (sinnar police station) दोन दिवसांपासून शहरात नियम तोडणार्‍या वाहनधारकांवर कारवाईची (Action) मोहीम सुरु करण्यात आली असून बसस्थानक परिसरात महामार्गावरुन जाणार्‍या वाहनांना थांबवून त्यांची कागदपत्रे तपासली जात असल्याने टवाळखोर दुचाकीधारकांना चाप बसणार आहे…

- Advertisement -

शहरात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांकडून (police) शहरात फिरणार्‍या संशयास्पद दुचाकींची तपासणी केली जात आहे. नंबर प्लेट नसणार्‍या दुचाकी, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रीपल शिट प्रवास करणार्‍या दुचाकींना अडवून त्यांची तपासणी केली जात आहे.

बेशिस्त चालक, र्फन्सी नंबर प्लेट असणार्‍यांना प्रत्येकी 200 रुपयांचा दंड करण्यात आला. बिनधास्तपणे दूचाकीवर तिघे बसून फिरत असणारे चालकही पोलीसांना आढळले.

अशा दुचाकी चालकांकडूनही 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात 15 ते 20 वाहनधारकांकडून 3 हजारांचा दंड (fine) वसूल करण्यात आला. या मोहीमेत पोलीस हवालदार रविंद्र चिने, आप्पासाहेब काकड, सुशील शिंदे, कृष्णा कोकाटे सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या