Friday, May 3, 2024
Homeनाशिकअंबड पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाई

अंबड पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाई

नवीन नाशिक । प्रतिनिधी

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौकाचौकात बसून टवाळ खोरी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेखानागर, शिवाजी चौक, रानाप्रताप चौक, दत्त चौक, विजय नगर, संभाजी स्टेडियम परिसर, उत्तम नगर,पवन नगर त्रिमूर्ती चौक आदी ठिकाणी चौकाचौकात बसून टावलखोरी, तसेच दहशत माजविनाऱ्या तरुणांवर अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात आली.

यावेळी पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत टवाळखोरांचा चांगलाच समाचार घेतला. महिलांची छेडछाड करणाऱ्या तसेच उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना चपराक बसावी म्हणून खुद्द महिला पोलिसांकडून च टवाळखोरांना दांडुक्याने प्रसाद देण्यात आला.

थर्टीफर्स्ट च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई केली जात असून ही कारवाई सुरूच राहणार असे अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या