Friday, May 3, 2024
Homeनाशिकथकित वसुलीसाठी धडक कारवाई

थकित वसुलीसाठी धडक कारवाई

ओझर। वार्ताहर Ozar

येथील ग्रामपालिकेच्या मालकीच्या जागेवर भाडेतत्वावर असलेल्या काही व्यावसायिक गाळेधारकांच्या वाढलेल्या थकबाकीमुळे प्रशासने कारवाईचे हत्यार उपसल्याने ग्रामसेवकांचा रौद्रवतार बघून अनेकांना तुकाराम मुंडेंचीच कार्यपद्धती आठवली.

- Advertisement -

येथे वाढत असलेल्या जुन्या थकबाकीमुळे ग्रामपालिका अनेक वर्षांपासून काही गाळेधारकांना वसूली करण्यासाठी मागे लागली होती. त्यात अनेकांनी येऊन ती भरली देखील. शेवटी उरलेल्या 37 गाळे धारकांना येथील ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर यांनी 15 दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या. त्यास 29 जणांनी सकारात्मक प्रतिसाद देत रकमा जमा केल्या असता उरलेल्या 8 जणांवर नोटिशीची मुदत संपल्यावर गुरुवारी सकाळी देवकर यांनी आपला मोबाईल बंद करुन सेवकांना सोबत घेऊन कारवाई करायला सुरवात केली.

त्यात मटण मार्केट येथील पाच, प्रियदर्शनी येथील एक तर खंडेराव मंदिर जवळ दोन अशा 8 गळ्यांना सील केले. याप्रसंगी काही भाडेकरुंची प्रशासनाबरोबर बाचाबाची झाली. देवकर यांनी ठाम पवित्रा घेतल्याने सील झालेल्या दुकानदरकांनी एकूण 4 लाख 10 हजार रुपये आणून भरले. नंतर सगळ्यांची दुकाने उघडण्यात आली. याप्रकरणी दुपारनंतर ओझर शहरात एकच चर्चा घडली. या कारवाईत दिलीप ठुबे, संतोष सोनवणे, योगेश गोरे, तुकाराम गवळी, सतीश सोनवणे, योगेश गोरे आदींसह ओझर ग्रामपालिका सेवक सहभागी झाले होते.

घरपट्टी वसुलीसाठी मोहीम

मार्च अखेरीस करोना संचारबंदी लागू झाल्यानंतर ग्रामपालिकेची आर्थिक स्थिती त्यावेळी केलेल्या उपाययोजनांमुळे काहीशी बिघडली. आज उत्पन्नाचे स्रोत हे कर असतांना अनेक लोक ते भरण्यास टाळाटाळ करत होते. काही दिवसात पाणी आणि घरपट्टी वसूलीसाठी देखील अशीच वसूली मोहिम हाती घेण्यात येणार आहे.

दत्तात्रय देवकर, ग्रा.वि. अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या