Friday, May 3, 2024
Homeधुळेथर्टीफस्टला 14 दारुड्यांवर कारवाई

थर्टीफस्टला 14 दारुड्यांवर कारवाई

धुळे । Dhule प्रतिनिधी

थर्टीफस्टला अपघात होवू नये म्हणून पोलीस दलातर्फे नाकेबंदी करुन दारु पिवून वाहन चालविणार्‍या (drunkards) 14 जणांवर कारवाई (Action) करण्यात आली. त्यात 12 मोटार सायकली तर दोन चारचाकी वाहन चालकांचा समावेश आहे.

- Advertisement -

थर्टीफस्टला बुलेट गाड्यांचे फटाके फोडणारे आवाज करणे, अंमली पदार्थाचे सेवन करुन सार्वजनिक रस्त्यांवर वाहन चालविणे. अशा प्रकारामुळे रस्ते अपघात होतात. त्यामुळे पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार 31 डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने रात्री 8 ते 12 वाजेदरम्यान बारापत्थर, दसेरा मैदान, नगावबारी, पोस्ट ऑफीस या चौकात नाकेबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात आली. त्या तपासणी दरम्यान अंमली पदार्थांचे (दारुचे) सेवन करुन वाहन चालविणार्‍या 14 जणांवर कारवाई केली.

त्यात 12 मोटार सायकल व दोन चारचाकी वाहन चालक यांचा समावेश आहे. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे कारवाई करण्यात आली. सदर वाहनधारकांना 2 जानेवारी रोजी न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. सदर कारवाई शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक धिरज महाजन, सपोनि एस.आर. राऊत व अन्य कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

चार दिवसात एक लाख 40 हजाराचा दंड वसुल

थर्टीफस्ट दरम्यान अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे दि. 28 ते 31 डिसेंबर दरम्यान शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करुन कारवाई करण्यात आली.

त्यात दारु पिवून वाहन चालविणार्‍या 33 वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे, बुलेट मोटार सायकलींच्या सायलेन्सरमध्ये बदल करुन फटाके फोडणार्‍या सहा बुलेटवर मोटार वाहन कायदा कलम 198 प्रमाणे, वाहन चालवितांना मोबाईल फोन वापर करणार्‍या आठ वाहनधारकांवर मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे, ट्रीपल शीट वाहन चालविणार्‍या 12 वाहनधारकांना मोटार वाहन कायदा कलम 128 प्रमाणे, महामार्गावर विना हेल्मेट प्रवेश करणार्‍या 15 मोटार सायकल स्वारांवर मोटार वाहन कायदा कलम 129 प्रमाणे कारवाई करण्यात आली.

यातील वाहन चालकांचे परवाना निलंबन करण्यासाठी पोलीस दलातर्फे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या कालावधीत एक लाख 40 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या