Thursday, May 2, 2024
Homeनाशिक‘मुक्त’चा लोगो वापरणार्‍यांवर होणार कारवाई

‘मुक्त’चा लोगो वापरणार्‍यांवर होणार कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ज्ञानगंगा घरोघरी असे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या लोगोचा (YCMOU Logo) समाज माध्यमांवर (Social Media) वापर करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार्‍यांवर आता सायबर पोलिसांतर्फे (Cyber Police) कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. गेल्या दोन महिन्यात साधारण पाच प्रकार समोर आले आहेत. याबाबत मुक्त विद्यापीठाने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे…

- Advertisement -

करोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून घरूनच शिक्षण आणि परीक्षा होत आहेत. याचाच फायदा घेत काही समाजकंटकांकडून यूट्यूब तसेच टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया व्यासपीठावर विद्यापीठाच्या नावे विविध चॅनल तयार करून त्यावर विद्यापीठाचा लोगो वापरला जात आहे.

यामध्ये प्रामुख्याने परीक्षा सत्र, माहितीपर संदेश आदी सकारात्मक माहिती तर दिली जातेच पण त्यासोबतच प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिकांचीदेखील देवाण-घेवाण होत आहे.

विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी यांच्यासह शिक्षकांचे वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकदेखील यामार्फत पसरवले जात आहेत. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्यासोबतच विद्यापीठाची बदनामी होण्याची शक्यता जास्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या