Thursday, May 2, 2024
Homeनाशिकअनधिकृत होर्डींग्जवर होणार कारवाई

अनधिकृत होर्डींग्जवर होणार कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील अनेक ठिकाणी लहान-मोठ्या स्वरूपाच्या अनधिकृत होर्डिंग्ज (Unauthorized hoardings )लावण्याचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला आहे. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत असून शहर विद्रुपीकरण देखील होत आ. महापालिका प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar )यांनी शहर विद्रुप करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून सर्व विभागीय अधिकार्‍यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून प्रशासनाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अतिक्रमण मोहीम राबवण्याबरोबरच थकीत असलेली कोट्यवधींची रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सहाही विभागात कुठेही अनधिकृत होर्डिग्ज दिसता कामा नये, अशा सूचना अधिकार्‍यांना दिल्यात.

ज्या दिवशी आयुक्त रमेश पवार यांनी नाशिक महापालिकेचा पदभार स्विकारला, त्याचदिवशी त्यांनी नाशिक शहर हे सुंदर शहर आहे. मात्र सीबीएससह अनेक ठिकाणी लागलेल्या होर्डिग्जमुळे शहराचे सौदर्य आहे ते खराब होउन त्याचे विद्रुपीकरण दिसतेेे. त्यामुळे अशा प्रकारचे होर्डिग्ज काढून ह्रोर्डिग्जमुक्त शहर कसे करता येइल यावर रोखठोक बोलले होते.

दरम्यान, नाशिक शहरातील विविध भागात जन्मदिवसाचे, स्वागताचे, विविध व्यवसायाचे मोठ-मोठे होर्डिग्ज अनेक ठिकाणी सहज दिसून येतात. अनेकदा या होर्डिग्जवर नागरिकांनी तक्रारी व नाराजी यापूर्वी व्यक्त केली आहे. या होर्डिग्जमुळे विद्रुपीकरण तर होतेच शिवाय विविध अपघात ही झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या