Friday, May 3, 2024
Homeनगरबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साईचरणी लीन

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साईचरणी लीन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

अभिनेते अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) बुधवारी शिर्डीत (Shirdi) येवून साई चरणी नतमस्तक झाले. मी साईबाबांचा (Sai Baba) भक्त आहे. साईंच्या दर्शनानंतर मला नेहमीच चांगली अनुभूती येत असते, असा अभिप्राय अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) याने दिला.

- Advertisement -

धक्कादायक! त्याने पाचशे रूपयांसाठी टुरिस्ट व्यावसायिकाचा केला खून

अभिनेते अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) यांच्या स्वागतासाठी संस्थानच्या वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव (CEO Rahul Jadhav) उपस्थित होते. साई संस्थानच्या वतीने शाल व उदी प्रसाद देण्यात आला. अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) यांना बघण्याकरिता भाविक व शिर्डी (Shirdi) ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या चहात्यांनी साई नामाचा जय घोष केला. त्यांनी सर्वांना त्यांनी अभिवादन केले. साई मंदिराच्या (Sai Temple) दर्शनात चांगला बदल पाहायला मिळाला.

पदाधिकार्‍यांनो, अधिकृत पत्र दिले तरच साईंचे व्हिआयपी दर्शन मिळणार

चांगले दर्शन मिळते, यासाठी प्रशासन प्रयत्नशील दिसते. मी नेहमीच दर्शनाला येत असतो असं अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) यांनी अभिप्राय लिहिताना म्हटले. दर्शन करून बाहेर जात असताना त्याना पाहता- पाहता एक भाविक पडला होता. त्यांनी त्या भाविकाला हात देऊन उभे केले. एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ते प्रख्यात आहे.

संवर्ग चारमध्ये तीन टप्प्यात होणार गुरूजींच्या बदल्या

देशाबद्दलची निष्ठा ही एक त्याची खासियत आहे. प्रवेशद्वार क्र.2 बाहेर निघतांना उपस्थित भाविकांना त्याने हात जोडून अभिवादन केले. या प्रसंगी पोलीस उप अधीक्षक संजय सातव, मंदिर सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदीसह साईबाबा संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.

राहाता नगरपरिषदेकडून प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत 25 लाख निधी वितरीत

- Advertisment -

ताज्या बातम्या