Monday, May 20, 2024
Homeधुळेअभिनेत्री केतकी चितळेवर धुळे जिल्ह्यात दुसरा गुन्हा दाखल

अभिनेत्री केतकी चितळेवर धुळे जिल्ह्यात दुसरा गुन्हा दाखल

धुळे : dhule

राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) खा.शरद पवार (mp Sharad Pawar) याच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी (Actress Ketki Chitale) अभिनेत्री केतकी चितळेवर धुळे जिल्ह्यात दुसरा गुन्हा दाखल झाला.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी धुळे तालुका (police) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल (Shindkheda) शिंदखेडा पोलिसातही गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी शिंदखेडा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक प्रोफाईलवरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून पोस्ट खाली अ‍ॅड. नितीन भावे असे नाव टाकून खा.शरद पवार यांची बदनामी केली. त्यामुळे समाजाच्या विविध गटात तेढ निर्माण झाला असून व्देशभावना वाढील लागल्या आहेत. अशांतता निर्माण झाली आहे. म्हणून अभिनेत्री केतकी चितळेवर भांदवि कलम 153 ए, 500, 501, 505, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि गोरावडे तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या