Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमआढाव दाम्पत्य हत्याकांड; साक्षीदार वकिलांनी संशयित आरोपींना न्यायालयात ओळखले

आढाव दाम्पत्य हत्याकांड; साक्षीदार वकिलांनी संशयित आरोपींना न्यायालयात ओळखले

अपहरणाच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज सादर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अ‍ॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अ‍ॅड. मनीषा आढाव यांच्या खूनप्रकरणी खटल्यात काल, सोमवारी अपहरणाच्या दिवशीचे राहुरी न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यात आले. त्यावर सुनावणी पार पडली. दरम्यान, यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी साक्षीदार वकिलाची सरतपासणी घेतली. त्यावेळी साक्षीदार वकील यांनी हत्याकांडातील संशयित आरोपींना न्यायालयात ओळखले. संशयित आरोपींच्या वकिलांनी साक्षीदारांची उलट तपासणी सुरू केली असून, उर्वरित उलट तपासणी आज (मंगळवारी) होणार आहे.
राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग याच्यासह पाच जणांना अटक केलेली आहे.

- Advertisement -

सोमवारी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षाकडून अ‍ॅड. निकम व मुख्य संशयित आरोपी किरण दूशिंग याच्या वतीने अ‍ॅड. सतीश वाणी यांनी बाजू मांडली. या खटल्यातील वकिल साक्षीदार यांनी न्यायालयात सांगितले की, 25 जानेवारी 2024 रोजी दुपारी न्यायालयाकडे येत असताना निळ्या रंगाची कार दिसली. त्यात ड्रायव्हर सीटवर एक व्यक्ती बसला होता. त्याच्या शेजारील सिटवर अ‍ॅड. राजाराम आढाव बसलेले होते. आज काय नगरला दौरा आहे का असे विचारले असता अ‍ॅड. आढाव यांनी शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे पाहिले. तो व्यक्ती तुला काय करायचे असे म्हणाला. त्यावर अ‍ॅड. आढाव म्हणाले ते वकील आहेत. त्यांच्याशी नीट बोला. दरम्यान, सुनावणी सुरू असताना साक्षीदारास न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे रेकॉर्डिंग दाखविण्यात आली. त्यात अ‍ॅड. आढाव दाम्पत्यास यांनी ओळखले. तसेच, संशयित आरोपींनाही ओळखळे. रेकॉर्डिंग पाहून न्यायालयातील सर्व घटनाक्रम त्यांनी सांगितला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या