Thursday, June 18, 2026
HomeनगरAhilyanagar : अधिक मासमुळे आता थेट पुढच्या वर्षीच ‘लग्नगाठ’

Ahilyanagar : अधिक मासमुळे आता थेट पुढच्या वर्षीच ‘लग्नगाठ’

17 मेपासून आठ महिने शुभमुहूर्तांच्या तारखांमध्ये खंड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लग्न समारंभासाठी मुहूर्त पाहिला जातो. शुभ मुहूर्ताच्या तारखेनंतरच लग्न निश्चित ठरविले जाते. लग्नाचा सिझन जोरात सुरू असताना अधिक महिन्याची एंट्री होणार आहे. 17 मे पासून पुढील आठ महिने शुभमुहूर्ताच्या तारखा नाहीत. शुभ मुहूर्त उपलब्ध नसल्याने ज्यांच्या घरात लग्नाची बोलणी सुरू आहेत, अशा लग्नाळुची अडचण होणार आहे. तसेच लग्नासाठी शुभमुहूर्तासाठी 2027 ची वाट पाहवी लागणार आहे.

- Advertisement -

यंदा 17 मे ते 15 जून या काळात अधिक मास आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यानंतर लगेच जुलैपासून गुरू आणि शुक्र ग्रहांचा अस्त होणार असून चातुर्मासाची सुरुवात होईल. या काळात मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. तसेच ऑक्टोबरपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असल्याने त्याचाही परिणाम विवाह मुहूर्तावर होणार आहे. यामुळे विवाहासाठी मुहूर्ताचा मोठा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे विवाह इच्छुकांचा कोंडमारा होणार आहे. अधिक मास असल्याने शुभकार्ये बंद, जुलैपासून गुरू-शुक्राचा अस्त आणि चातुर्मास प्रारंभ, ऑक्टोबरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे मुहूर्ताची अडचण, पुढील मुहूर्त थेट जानेवारी 2027 मध्ये.

दरम्यान, मुहूर्ताच्या टंचाईमुळे सध्या मंगल कार्यालये, बँड पथक, केटरिंग आणि फोटोग्राफर्सकडे बुकिंगचा महापूर आला आहे. एकाच दिवशी अनेक लग्नसोहळे असल्याने सेवा पुरवठादारांवर मोठा ताण येत आहे. ग्रामीण भागात तर आचारी आणि इतर व्यवस्था मिळणे कठीण झाले असून, ऐनवेळी मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. एकाच दिवशी अनेक लग्न असल्याने नातेवाइकांपुढेही पेच निर्माण होणार आहे.

जानेवारी 2027 पासून पुन्हा मुहूर्ताचा धडाका
जिल्ह्यात यंदा अधिक मास (धांड्याचा महिना) असल्याने 17 मे पासून लग्नांचे मुहूर्त नाहीत. त्यानंतर वेगवेगळ्या कारणामुळे लग्नाचे मुहूर्त थेट 2027 मध्ये आहेत. यामुळे मुहूर्तावर लग्न करणार्‍यांना सहा ते सात महिने वाट पाहवी लागणार आहे.

व्यावसायिकांची चिंता वाढली
विवाह सोहळ्यांमुळे लाखो रूपयांची उलाढाल होत असते. या खंडामुळे मंगल कार्यालये, बॅड, शिजे, आचारी, मंडप, किराणा दुकानदार यासारख्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. तब्बल आठ महिने लग्न मुहूर्त नसल्याने या मंडळींना मोठ्या प्रमाणात संकटाशी सामना करावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना

Shivsena Operation Tiger: शिवसेना ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटला; बंडखोर ६ खासदारांनी...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiशिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा फुटल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर...