Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रबारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया कशी असणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया कशी असणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई

बारावीनंतरच्या विविध शाखांमधील प्रवेशाची (Admissions after 12th class). हे प्रवेश कधीपासून सुरु होणार, यंदा या प्रवेशासाठी नेमकं काय करावं लागणार? याबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday samant) यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली आहे. व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सीईटीचे (CET) धोरण जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

फक्त ९५० रुपयांत विमान प्रवाशाची संधी

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा 26 ऑगस्ट पासून होणार आहे. तर इंजिनिअरिंगची सीईटी परीक्षा 4 ते 9 सप्टेंबर आणि 9 ते 14 सप्टेंबर या दोन सत्रात होणार आहे. एलएलबी सीईटी 16 ते 9 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.

बारावीच्या गुणांवरुन प्रवेश

बारावीच्या मार्कांवरच कॉमर्स , सायन्स (Science) आणि आर्ट या शाखांमध्ये (Arts) प्रवेश दिला जाणार आहे. यासंबंधीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. यंदा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानं महाविद्यालयांना तुकड्या वाढवण्याची मागणी करणारं पत्र देण्याचे आदेश दिले आहेत. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा दावाही यावेळी उदय सामंत यांनी केला.

कॉलेज कधी सुरु होणार

शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार याबद्दलचा निर्णय 8 दिवसात घेणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू होताना निकष वेगळे असणार आहे. आठ दिवसांत अभ्यास करुन ज्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, त्या ठिकाणचे कॉलेज सुरु करण्याच्या सूचना कुलगुरुंना दिल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होतपर्यंत त्यांना संपूर्ण शुल्क माफ असणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावं लागणार नाही. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सामंत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या