Thursday, May 15, 2025
Homeनगरवकिलाकडून पक्षकारास मारहाण

वकिलाकडून पक्षकारास मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

न्यायालयात खटला चालविण्यासाठी कमी फी दिल्यावरून वकिलाने पक्षकारास मारहाण केली. सावेडीतील तपोवन रस्त्यावर गुरूवारी रात्री ही घटना घडली. सचिन बाबासाहेब दहिफळे (वय 36 रा. हनुमान मंदिरासमोर, शिवाजीनगर, तपोवन रोड, सावेडी) असे मारहाण झालेल्या पक्षकाराचे नाव आहे.

याप्रकरणी दहिफळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वकिल गोरक्षनाथ तांदळे, शेखर मुळे (रा. निर्मलनगर) व दोन अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन बाबासाहेब दहिफळे यांनी अ‍ॅड. गोरक्षनाथ तांदळे यांच्याकडे न्यायालयातील खटला सोपविला होता. अ‍ॅड. तांदळे यांनी हा खटला चालविण्यासाठी आणखी फी ची मागणी केली. फीच्या मागणीसाठी अ‍ॅड. तांदळे हे गुरूवारी रात्री दहिफळे यांच्या घरी आले. पैशाची मागणी केली, तांदळे आणि त्याच्या समवेत असलेल्या शेखर मुळे आणि दोन अनोळखी तरुणांनी घरात घुसून दहिफळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरातील कपाटाच्या काचा फोडून नुकसान केले. दहिफळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : सीसीटीव्ही लावा, सेवकांची मद्य चाचणी करा; राज्य सरकारची...

0
मुंबई | Mumbai  महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे...