Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशAditya L-1: सूर्य मोहीमेच काऊंटडाऊन सुरु

Aditya L-1: सूर्य मोहीमेच काऊंटडाऊन सुरु

मुंबई | Mumbai

चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिमेला यश मिळत असतानाच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून (ISRO) आणखी एका मोहिमेच्या तयारीला वेग आला आहे. ही मोहिम म्हणजे, इस्रोची सूर्य मोहिम आदित्य एल-१(Aditya L-1 Mission) . इस्रोची ही महत्त्वाकांक्षी मोहीम PSLV-XL रॉकेटच्या मदतीने २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणार आहे.

- Advertisement -

सूर्याभोवती भ्रमंती करण्याच काम आदित्य एल-१ उपग्रह करणार आहे. या मिशनच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करण्याचा इस्रोचा उद्देश आहे. सूर्या विषयीची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न असेल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-१ मिशन लॉन्च केले जाईल. लॉन्चिंग आधीची रिहर्सल पूर्ण झाली आहे.

One Nation One Election : ‘एक देश एक निवडणूकी’च्या दृष्टीने एक पाऊल पुढे, माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य L-१ या अंतराळयानाला L-१ बिंदूवर घेऊन जाईल. L-१ हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे, म्हणजेच १५ लाख किलोमीटर, तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५ कोटी किलोमीटर आहे.

या मिशनची एकुण किंमत ४०० कोटी रुपये आहे. PSLV-C57 रॉकेटद्वारे आदित्य एल-१ सॅटलाइट पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडले जाईल. या मिशनमध्ये एकूण ७ पेलोडचा वापर केला जाईल. उपग्रहातील ४ पेलोड सूर्याचा अभ्यास करतील. उर्वरित ३ उपकरणे एल-१ क्षेत्राचा अभ्यास करतील.

India Alliance Logo : ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकललं, कारण काय?

या मोहिमेतील आव्हानं

या मोहिमेदरम्यान असणारा सर्वात मोठा धोका म्हणजे यानाचा वेग. जर, आदित्य एल-१ च्या वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही, तर हे यान सूर्याच्या दिशेने जाताना वाटेतच नष्ट होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे यानाचा वेग कमी करता आल्यासच ही मोहिम यशस्वी ठरेल.

भारता आधी कोणत्या देशांनी सुर्याची मोहिम केली आहे?

भारताच्या आधी अमेरिका, जापान, यूरोप आणि चीनने सूर्याचा अभ्यास केलाय. सूर्यावर जाणारा भारत पहिला देश नाहीय. हे भारताच सूर्याच्या दिशेने पहिले पाऊल नक्की आहे. त्यामुळे आता सर्व जगाची नजर या मिशनवर असेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या