Thursday, May 2, 2024
Homeजळगावसात दिवसानंतर बाळांसह मातांचे डीएनए प्रयोगशाळेत रवाना!

सात दिवसानंतर बाळांसह मातांचे डीएनए प्रयोगशाळेत रवाना!

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्हा वैद्यकीय व रुग्णालयातील (District Medical and Hospital) डॉक्टरांसह कर्मचार्‍यांच्या (staff , doctors) हलगर्जीपणामुळे (laziness) नवजात बाळांची (newborn babies)अदलाबदल (exchange) झाल्याची घटना दि. 2 मे रोजी घडली होती. बाळांच्या पालकांकडून मुलगा असलेल्या बाळावर दावा केला जात असल्याने डॉक्टरांची चांगलीच पंचाईत झाली झाल्याने बाळ व त्यांच्या मातांची डीएनए चाचणी करण्याचा निणर्र्य घेण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी डीएनए चाचणीसाठी (DNA test) फॉरेंसिक लॅबची कीट उपलब्ध झाले. त्यानंतर रविवारी दोन्ही बाळांचे व त्यांच्या मातांचे रक्तनमूने घेवून ते चाचणीसाठी नाशिक येथिल न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुवर्णा सोनवणे (वय-20, रा. टहाकळी ता. भुसावळ) आणि प्रतिभा प्रतिभा भिल (वय-20, रा. कासमपुरा ता. पाचोरा) या दोन्ही गरोदर महिला प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्या दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मंगळवारी दि. 2 रोजी त्यांचे सिझर करण्यात आले. काही वेळाच्या अंतराने दोघांचे सिझर झाल्यानंतर परिचारीकेकडून निरोप देतांना चूक झाल्याने दोन्ही कुुटुंबाकडून बाळांविषयी दावा केला जात होता. बाळांच्या पालकांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे शिंशूंच्या डीएनए चाचणीचा निर्णय घेतल्यानंतर चाचणीची प्रकीया सुरु करण्यात आली होती.

VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

पाच दिवसानंतर मिळाले कीट

डीएनएफ चाचणीसाठी नवजात बाळांसह त्यांच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी फॉरेंसिक लॅबची कीटची आवश्यकता होती. त्यानुसार जिल्हापेठ पोलिसांनी पत्र दिल्यानंतर नाशिक येथून कीट मागविले होते. परंतू गेल्या आठवड्यात सुट्ट्या आल्यामुळे पाच दिवसानंतर शनिवारी किट मिळाले.

VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

पोलिसांच्या समक्ष घेतले नमुने

शनिवारी चार कीट प्राप्त झाल्यानंतर रविवारी संपुर्ण कादपत्रांची पुर्तता करुन पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह कर्मचार्‍यांच्या समक्ष दोन्ही बाळांसह त्यांच्या मातांचे रक्तनमूने घेण्यात आले. त्यानंतर नमूने सिलबंद करुन ते कर्मचार्‍याच्या सोबत नाशिक येथिल न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

VISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदा

सात दिवसांपासून बाळ आईच्या दुधाविनाच

गेेल्या आठवड्यात जन्मलेल्या त्या नवजात बाळांचे पालकच निश्चित न झाल्यामुळे सात दिवसांपासून अतिदक्षता विभागात असलेल्या बाळांना आपल्या आईचे दूध मिळालेले नाही. त्यांना वरुच डब्यातील दुध दिले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. परिचारीकांच्या चुकीमुळे नुकत्याच जन्मलेल्या बाळांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.

आता डीएनएच्या अहवालाची प्रतीक्षा

नवजात बाळांचे पालक निश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून डीएनए चाचणीची संपुर्ण प्रक्रीया करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तो पर्यंत माता बाळांपासून दुरावलेलेच राहणार आहे. डीएनएचा अहवाल आल्यानंतर त्यावरुन त्या नवजात बालकांचे पालक ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या