Friday, May 3, 2024
HomeजळगावVideo पंचनामे झाल्यानंतर पुरग्रस्तांना मदत-ना.जयंत पाटील

Video पंचनामे झाल्यानंतर पुरग्रस्तांना मदत-ना.जयंत पाटील

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील गावांचे महापुरांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चालू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानतंर सर्वांना लवकरच शासनातर्फे मदत दिली जाईल. तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर गावांच्या सरक्षणासाठी आवश्यक त्या गावांना संरक्षण भिंती बांधण्याच्या सूचना देण्यात येणार आहे. तसेच शेतकर्‍यांना आलीकडे शासनाने ठरवलेल्या निकषानुसार मदत दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी दिली आहे.

- Advertisement -

पाटणादेवी (Patna Devi) डोंगर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडून शहरातून वाहनार्‍या तितुर नदीसह तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना महापुर आला होता. या पुरात अनेकांचे घरे, संसार वाहुन गेले, तर शेकडो गुरे मारण पावली, तसेच शेतक्यांच्या पिकांचे देखील मोठे नूकसान झाले आहे, आज संकाळी नूकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तालुक्यात राष्ट्रवादीचे प्रदेशध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील हे आले होते. पाहणी दरम्यान त्यांनी नूकसाग्रस्त भागाचे शासनातर्फे पंचनामे सुरु आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानतंर सर्वांना मदत देण्यात येणार आहे. तर शेतकर्‍यांना शासनाने आलीकडेच जाहिर केलेल्या धोरणानूसार मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली.

नदीच्या काठच्या गावांना सरंक्षण भिती उभारणार

भविष्यात पुराच्या पाण्यापासून गावाचे सरंक्षण करण्यासाठी नदीकाठच्या गावांना आवश्यकतेनूसार सरंक्षण भिती बांधण्यात येणार आहे. तसेच शहरासह इतर ठिकाणी नदीकाठी विनापरवाना बांधकाम असलेले सर्व अतिक्रमण काढण्यात येणार आहे. तशी सूचना मी जिल्हाधिकारी यांना देणार आहे.

(ED) ईडी, (CBI) सीबीआयचा वापर विरोधकांना नामोहाराम करण्यासाठी-

नाथाभाऊंना बदनाम व त्रास देण्यासाठी सतत ईडीचा वापर केला जात आहे. तसेच महाराष्ट्रात विरोधकाना त्रास देण्यासाठी तसेच त्यांना नामोहाराम करण्यासाठी ईडी, सीबीआयाचा वारंवार वापर करण्यात येत असल्याचा आरोप ना.जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना केला. या दौर्‍यात त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैया पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हादुध संघाचे प्रमोद पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या