Friday, July 24, 2026
Homeक्राईमShrigonda : दोघा एजंटांना झटका; न्यायालयीन कोठडीत वाढ

Shrigonda : दोघा एजंटांना झटका; न्यायालयीन कोठडीत वाढ

बहुचर्चित सिस्पे, इनफिनिटी, बीकॉन कंपनी फसवणूक प्रकरण

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

न्यायालयाने फसवणूक प्रकरणातील एजंट अनिल दरेकर व रंगनाथ उर्फ पिंटू गलांडे यांच्या कोठडीमध्ये 8 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. त्यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सोमवारी (दि.28) सुनावणी झाली. बहुचर्चित सिस्पे, इनफिनिटी, बीकॉन फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांच्या जामीनावर सुनावणीदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षकांनी तपासासाठी मुदत मागितली.

- Advertisement -

राज्याच्या विविध भागात गाजलेल्या सिस्पे, इनफिनिटी बीकॉन आदी एलएएलपी कंपन्यांच्या माध्यमातून श्रीगोंदा, पारनेर, सूपा, नगर, बारामती, हडपसर, पुणे येथील गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून मागील सहा महिन्यांपासून कुठलाही परतावा दिला नाही. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये 7 जुलैला सिस्पे, इनफिनिटी बीकॉन आदी कंपनीचा संचालक नवनाथ औताडे आणि इतरांविरोधात श्रीगोंदा आणि नगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

नवनाथ जगनाथ औताडे, अगस्त मिश्रा, राहुल काळोखे, गौरव सुखदिवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, ययाती मिश्रा, शुभम नवनाथ औताडे, सुवर्णा नवनाथ औताडे, रंगनाथ उर्फ पिंटू गलांडे, अनिल दरेकर, संदीप दरेकर अशी आरोपींची नावे आहेत. आता अटक केलेले दोन एजंट न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, नवनाथ औताडे व त्याची पत्नी आणि मुलगा यांची अटकपूर्व जामिनासाठी हालचाल सुरू असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

पंचवटी

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने...

0
नाशिक | प्रतिनिधीजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर...